भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा आखाडा जोरदार सुरु आहे. ऐन निवडणूक रंगात आली असताना भाजपला मोठा धक्का बसलाय. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे मेव्हणे संजय सिंह मसानी यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला आहे.
संजय सिंह मसानी हे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नी साधना सिंह यांचे भाऊ आहेत. त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि प्रचार समितीचे प्रमुख ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, त्यानंतर त्यांनी भाजपवर टीका केली. मध्य प्रदेशमध्ये नाथ हवेत, शिवराज नको, असे संजय यांनी दिल्लीत बोलताना म्हटले आहे. त्यांनी भाजपवर घराणेशाही राजकारणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे.
Delhi: Sanjay Singh, brother-in-law of #MadhyaPradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan, joins Congress party. pic.twitter.com/vMdFKiMmLL
— ANI (@ANI) November 3, 2018
राज्यात २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच 177 उमेदवारांची यादी जाहीर केली. आता काँग्रेसनेही आपल्या 155 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर लगेच भाजपला धक्का देत शिवराज सिंह चौहान यांचे मेव्हणे विरोधकांच्या गोटात सामील झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Congress releases list of candidates for 155 seats for the upcoming Assembly Elections in Madhya Pradesh. pic.twitter.com/P1C6i4G1g8
— ANI (@ANI) November 3, 2018