चीनी उद्योजक महिलेला मागे टाकत भारताच्या सावित्री जिंदाल बनल्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला

चीनच्या अब्जाधीश महिलेला मागे टाकत सावित्री जिंदाल आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात त्यांची संपत्ती अंदाजे $11.3 अब्ज इतकी आहे.

Updated: Aug 1, 2022, 10:49 AM IST
चीनी उद्योजक महिलेला मागे टाकत भारताच्या सावित्री जिंदाल बनल्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला title=

मुंबई : चीनच्या अब्जाधीश महिलेला मागे टाकत सावित्री जिंदाल आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात त्यांची संपत्ती अंदाजे $11.3 अब्ज इतकी आहे.

याआधी चीनच्या यांग हुआन या आशियातील सर्वात श्रीमंत महिला होत्या. यांग हुआन यांची संपत्ती 23.7 अब्ज डॉलरवरून 11 अब्ज डॉलरवर आली आहे. हुआन या प्रॉपर्टीच्या व्यवसायात कार्यरत आहेत.

मात्र चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीसदृष्य परिस्थितीमुळे हुआन यांच्या संपत्तीत घट झाली आहे. सावित्री जिंदाल या धातू आणि वीज निर्मितीच्या व्यवसायात आहेत. 

देशातील 10 व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती 

सावित्री जिंदाल यांची जानेवारीच्या तुलनेत जुलैमध्ये घट झाली आहे, तरीही त्यांनी चिनी महिलेकडून सर्वात श्रीमंत होण्याचा मान हिरावून घेतला आहे. सावित्री जिंदाल या देशातील 10व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 2005 मध्ये जेव्हा त्यांचे पती ओपी जिंदाल यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले तेव्हा त्यांनी जिंदाल ग्रुपची कमान हाती घेतली होती.

जिंदाल समूह पोलाद उत्पादनातही गुंतलेला आहे, देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. यासोबतच जिंदाल समूह सिमेंट, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातही काम करतो.