मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. एसबीआय बँकही गेल्या काही वर्षांत वेगाने डिजिटलायझेशनचा अवलंब करत आहे. एसबीआयचे ग्राहक आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून पैसे सहज ट्रांसफर करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे. पण, डिजिटल व्यवहारासंदर्भातही अनेक धोके सध्या निर्माण झाले आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑनलाइन सेवा पुरवते. एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा OnlineSBI म्हणून ओळखली जाते. एसबीआयच्या सर्व किरकोळ आणि कॉर्पोरेट ग्राहकांकडून या सुविधेचा लाभ घेतला जातो. ऑनलाईन बँकिंगची सुविधा घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करावा लागतो. अशा परिस्थितीत, तुमचा पासवर्ड असा असावा की, कोणीही अंदाज करू शकत नाही हे महत्वाचे आहे.
वाढती फसवणूक लक्षात घेता, SBI आपल्या ग्राहकांना सतत अलर्ट जारी करते जेणेकरून ग्राहक कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नयेत. स्टेट बँकेने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे आणि आपण आपले ऑनलाइन बँकिंग पासवर्ड सशक्त बनवू शकतो हे लक्षात घेऊन काही स्टेप्स दिली आहेत. यामुळे तुमची ऑनलाइन बँकिंग सुविधा आणखी सुरक्षित होऊ शकते.
A strong password ensures higher levels of security. Here are 8 ways in which you can create an unbreakable password and protect yourself from cybercrime. Stay alert & #SafeWithSBI! #CyberSafety #StrongPassword #OnlineSafety #CyberCrime #StaySafe pic.twitter.com/ScSI8H5ApF
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 18, 2021
1. पासवर्ड तयार करताना अप्परकेस आणि लोअरकेस अक्षरे वापरा. उदा - aBJFugsG
2. पासवर्ड अल्फाबेटीकल व्यतिरिक्त, संख्या आणि चिन्हे प्रविष्ट करा. उदा - AGAgaG17Gg12!
3.पासवर्डमध्ये किमान 8 केरेक्टर वापरा. त्यात वर्णमाला, चिन्हे आणि संख्यांची जोड असावी.
4. पासवर्ड तयार करण्यासाठी कोणताही सामान्य शब्द वापरू नका.
5. पासवर्ड मध्ये सहज शोधता येईल किंवा त्याचा अर्थ लगेच लावला जाईल असा शब्द टाकणे टाळा. जसे - qwerty किंवा asdfg इ.
5. तसेच 12345678 किंवा abcdefgh सारखे पासवर्ड ठेवू नका.
6. DOORBELL - DOOR8377 सारखा पासवर्ड सुद्धा वापरू नका जेणेकरून कोणीही ते सहज काढू शकणार नाही.
7. तुमचा पासवर्ड लांब ठेवा आणि तो तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही जन्मतारखेच्या आधारावर ठेवू नका.
8. लक्षात ठेवा की, तुमचा पासवर्ड तुमची स्वाक्षरी आहे. तो तुम्हाला यूनिक आणि स्ट्रोंग ठेवावा लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. देशभरात त्याच्या 15 हजार पेक्षा जास्त शाखा आहेत. सध्या एसबीआयचे 45 कोटीहून अधिक ग्राहक आहेत.