सुरक्षा दलाला काश्मीर खोऱ्यात मोठे यश, चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.  

Updated: Apr 9, 2021, 08:28 AM IST
सुरक्षा दलाला काश्मीर खोऱ्यात मोठे यश, चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा
छाया सौजन्य - पीटीआय

मुंबई : जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाने (Security forces) तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर दोन दहशतवादी अद्याप लपून बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांच्या तीने सतत गोळीबार सुरु करण्यात येत आहे. ज्यास सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी अन्सार गजवतुल हिंदचा नेता इम्तियाज अहमदला घेराव घातला आहे. (Security forces have killed 3 terrorists in Shopian district of Jammu and Kashmir)

 बाबा मोहल्ल्यात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने त्या भागाला वेढा घातला आणि शोधमोहीम राबविली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवादी एका मशिदीत लपून बसले आहेत. दहशतवाद्यांना शरण जाण्यासाठी उद्युक्त करता यावे म्हणून सुरक्षा दलांनी दहशतवाद्याचा भाऊ आणि स्थानिक इमाम यांना मशिदीत पाठवले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. यासाठी दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी इमामांना पाठविण्यात आले आहे. शोध मोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, यावर सुरक्षा दलाने प्रत्युरासाठी केलेल्या कारवाईनंतर चकमकीला सुरुवात झाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. मात्र, दहशतवाद्यांची ओळख अद्याप उघड झालेली नाही.  सुरक्षा दलांनी अन्सार गजवतुल हिंदचा नेता इम्तियाज अहमद याला घरले आहे आणि दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की कारवाई सुरु आहे आणि काही काळानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

गेल्या महिन्यात 4 अतिरेकी ठार  

यापूर्वी 22 मार्च रोजी शोपियान जिल्ह्यातच सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले होते.  दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने रात्री उशिरा शोध मोहीम सुरु केली. सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना शरण जाण्यास सांगितले पण त्यांनी नकार दिला. यानंतर चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा दलाचे अतिरेक्यांचे जाळे संपविण्यास धडक कारवाई करण्यात येत आहे.. त्याअंतर्गत दहशतवाद्यांचा शोध घेऊन शोध घेतला जात आहे.