कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली, सिरमचे CEO Adar Poonawala यांनी सांगितलं की, "लोकांनी..."

Adar Poonawala On Covid: गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीन, जापान, अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अलर्ट जारी केला आहे. सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Serum Institute of India CEO Adar Poonawala) यांनी कोरोनाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

Updated: Dec 21, 2022, 03:39 PM IST
कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली, सिरमचे CEO Adar Poonawala यांनी सांगितलं की, "लोकांनी..." title=

Serum Institute of India (SII) CEO Adar Poonawala On Covid: गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीन, जापान, अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अलर्ट जारी केला आहे. "कोरोना अजून संपलेला नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार राहा.", असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Serum Institute of India CEO Adar Poonawala) यांनी कोरोनाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. "लोकांनी जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही. भारतात लसीकरण झालं आहे आणि ट्रॅक रेकॉर्डही जबरदस्त आहे. त्याचबरोबर लोकांनी सरकारनं सांगितलेल्या सूचनाचं पालन करावं", असं अदर पूनावाला यांनी सांगितलं आहे. अदर पूनावाला सीईओ असलेल्या सिरम इंस्टिट्यूटनं कोव्हिशिल्ड (Covishield) ही कोरोना लस तयार केली आहे. 

चीनमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अदर पूनावाला यांनी सांगितलं की, "चीनची कोरोना विरुद्ध लढण्याची रणनिती चुकीची आहे. खरं सांगायचं तर, त्यांची लस कोरोनावर प्रभावी नाही. त्यामुळे लोकं लस घेत नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांची कोरोना लस सुधारावी."

बातमी वाचा- Covid-19 Update : पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर

"जापान, अमेरिका, कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये कोरोनाचा फैलाव पाहता SARS द्वारे कोरोना व्हेरियंटचा मागोवा घेणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह केसेसच्या नमुन्यांची संपूर्ण जीनोम तयार करणे आवश्यक आहे.", असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत. देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना कोरोनाबाबत सूचना दिल्या आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर देशातील सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. 

ओमायक्रॉनचे नवे 2 व्हेरिएंट

चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रोच्या (Omicron) 2 नव्या सब व्हेरिएंटमुळे चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हात पाय पसरले आहेत. चीनच्या अनेक शहरातील रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे बीए.5.2  आणि बीएफ.7 हे सब व्हेरिएंट आढळले आहेत. या दोन व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.