प्री स्क्रिनिंगपूर्वी पद्मावती रिलीज केल्यास हिंसक आंदोलन करून

  माजी काँग्रेस नेता शंकरसिंह वाघेला यांनी आगामी चित्रपट 'पद्मावती'च्या रिलीजपूर्वी हिंदू आणि क्षत्रिय समुहाच्या नेत्यांसाठी स्क्रिनिंग करण्याची मागणी केली आहे. तसे नाही केल्यास हिंसक आंदोलन करू अशी धमकी वाघेला यांनी दिली आहे. 

Updated: Oct 25, 2017, 10:51 PM IST
प्री स्क्रिनिंगपूर्वी पद्मावती रिलीज केल्यास हिंसक आंदोलन करून  title=

अहमदाबाद :  माजी काँग्रेस नेता शंकरसिंह वाघेला यांनी आगामी चित्रपट 'पद्मावती'च्या रिलीजपूर्वी हिंदू आणि क्षत्रिय समुहाच्या नेत्यांसाठी स्क्रिनिंग करण्याची मागणी केली आहे. तसे नाही केल्यास हिंसक आंदोलन करू अशी धमकी वाघेला यांनी दिली आहे. 

या चित्रपटात काही तथ्यांची छेडछाड केली का याची शहानिशा करण्यासाठी प्री स्क्रिनिंग करण्याची मागणी वाघेला यांनी केली आहे. 

क्षत्रिय समाजाच्या नेत्यांनी सांगितले की,  हा चित्रपट एक डिसेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे भंसाळी यांनी सर्वप्रथम हा चित्रपट हिंदू तसेच क्षत्रिय नेत्यांना दाखवावा.  आम्हांला शंका आहे की या चित्रपटात काही तथ्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. 

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांची भूमिका असलेला हा चित्रपट येत्या एक डिसेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. यावर वाघेला म्हणाले की , स्वस्तातील प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही ऐतिहासिक घटनाशी छेडछाड झाली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे हा चित्रपट अक्षेपार्ह गोष्टीसह सादर करण्याची मंजुरी दिली जाता कामा नये.

चित्रपट रिलीज हा प्री-स्क्रिनिंग पूर्वी केलास तस गुजरातमध्ये हिंसक आंदोलन करण्यात येईल, अशी धमकी वाघेला यांनी दिली आहे. यामुळे कायदा आणि सूव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ लोकांनी कायदा आपल्या हातात घेतला तर त्यासाठी मी थिएटर मालकांची आताच माफी मागतो. 

'पद्मावती'चे 'घुमर' गाणं रसिकांच्या भेटीला

संजय लीला भंसाळींच्या बहुप्रतिक्षित  सिनेमा 'पद्मावती' चित्रपटातील पहिलं गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे. 

'घुमर' या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचा खास अंदाज दाखवण्यात आला आहे.  युट्युबवर हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या एका तासामध्येच या गाण्याला सुमारे १ लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. 

घुमर  हा राजस्थानी पारंपारिक नृत्यप्रकार आहे. जो खास प्रसंगी केला जातो. पद्मावती चित्रपटातील दीपिकाचा राजेशाही थाट थक्क करणारा आहे. पद्मावती' या मुख्य भूमिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार आहे. सोबत शाहीद कपूर आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहेत.

पद्मावतीच्या ट्रेलरलादेखील रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. १ डिसेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांनी जसा चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिला तसाच करणी सेना, राजपुत संघटना यांनी पद्मावती चित्रपटाला विरोध  दर्शवला आहे. आम्ही चित्रपट पाहिल्याशिवाय प्रदर्शित झाल्यास सिनेमागृहांची नासधुस केली जाईल अशा स्वरूपाच्या धमक्यादेखील देण्यात आल्या आहेत.