मुंबई : कार्पोरेट इंडियाला १.५ लाख करोड रुपयांच पॅकेज जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या आर्थिक उपाययोजनांचे नवे पॅकेज जाहीर केले.
ही घोषणा होताच शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास १६०० अंकांनी वधारला आहे. निफ्टीमध्ये ४५० अंकांनी वाढ झाली असून ११००० पर्यंत पोहोचली आहे. २० मेनंतर पहिल्यांदा शेअर बाजारात एवढी मोठी उसळी पाहायला मिळाली. (हे पण वाचा - मोठी बातमी: केंद्र सरकारकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात)
१३०० अंकांनी वाढला सेंसेक्स
भारतीय कंपन्यांसाठीचा कॉर्पोरेट टॅक्स २५.१७ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला. हे नवे दर तातडीने लागू होतील. यामुळे सरकारी तिजोरीवर १.४५ लाख कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र, या निर्णयामुळे देशातील गुंतवणूक आणि विकासाला चालना मिळेल, असे सितारामन यांनी सांगितले.
या घोषणेनंतर सेन्सेक्स १६०० अंकांनी वाढला असून ३७,००० पोहोचला आहे. निफ्टीत देखील ४५० अंकांनी वाढ झाली असून ११,००० पोहोचली आहे. निफ्टीमध्ये ५० शेअर्सपैकी जवळपास ४९ शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली आहे.