शिवसेना बिहारमध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढविणार

शिवसेनेने बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आपले 40 उमेदवार उतरविणार आहे.  

Updated: Dec 25, 2018, 05:54 PM IST
शिवसेना बिहारमध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढविणार title=

पाटणा : शिवसेनेने बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आपले 40 उमेदवार उतरविणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. या सर्व जागांवर आपले उमेदवार असतील, अशी माहिती बिहार सेनेचे अध्यक्ष कौशलेंद्र शर्मा यांनी दिली. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही विधानसभेसाठी जोरदार शक्तीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
निवडणूक रिंगणात उतरताना पक्षाचा बिहारच्या विकासाचा आणि राष्ट्रवाद हा मुद्दा असेल. हा मुद्दा घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. शिवसेना कधीही बिहारच्या विरोधात नव्हती. बिहारच्या मुद्द्याविरोधात शिवसेनेने राज ठाकरे यांचा पक्ष मनसेचाही विरोध केला आहे आणि टीकाही केली आहे. तसेच मुंबईतील छठ पूजामध्ये शिवसैनिकांचा सहभाग असतो, असे कौशलेंद्र शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.

राम मंदिरच्या मुद्द्यावरून भाजप भरकटलाय. त्यांनी हा मुद्दा सोडून दिलाय. भाजपचे नेते आता जाती-जातीत तेढ निर्माण करत आहेत. आता देवाचीही वाटणी करत आहेत. देवालाही जातीमध्ये अडकविण्याचा प्रयत्न होत आहे, असे ते म्हणालेत.

दरम्यान, भाजपचे राज्य उपाध्यक्ष देवेश कुमार यांनी शिवसेनेच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बिहारमध्ये एनडीए मजबूत आहे आणि आता जागा वाटपही जाहीर केले गेले आहे. 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याचे एनडीएचे एकमात्र ध्येय आहे. शिवसेनेला टार्गेट करताना म्हणालेत, महाराष्ट्रातील बिहारवासीयांची काय स्थिती आहे आणि याला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. भाजप नेहमीच बिहारच्या अभिमानासाठी काम करीत आहे आणि असेच करत राहील, असे ते म्हणालेत.

दरम्यान, विरोधकांनी भाष्य केलेय. शिवसेना भाजपला विरोध करत आहे, हे स्पष्ट होत आहे. भाजप गणित बिघडविण्यासाठी सेना रिंगणात अतरल्याचे म्हटलेय. 2015 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना एकटी निवडणूक रिंगणात उतलेली होती. पण त्यांना यश मिळाले नाही. पुन्हा एकदा, शिवसेनेने बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता बिहारमध्ये शिवसेना एनडीएला पराभूत करण्यास किती वेळ लागेल हे पहाणे आवश्यक आहे. जेथे सर्व विरोधी पक्ष एकत्र आहेत आणि भाजपशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याची चर्चा सुरु झालेय.