अप्रतिम शिव तांडव! Video पाहून तुम्ही पण व्हाल मंत्रमुग्ध

हा अप्रतिम आणि आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून तुमचं मन प्रसन्न करेल.

Updated: Jul 31, 2022, 07:06 PM IST
अप्रतिम शिव तांडव!  Video पाहून तुम्ही पण व्हाल मंत्रमुग्ध title=

Viral Video : श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात मोठ्या भक्तीभावाने महादेवाची पूजाअर्चा केली जाते. उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे. महादेवाचे अनेक अवतार नृत्य आणि गाण्यातून मांडण्यात आले आहेत. अशात सोशल मीडियाच्या खजिन्यातून एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा अप्रतिम आणि आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून तुमचं मन प्रसन्न करेल.

मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अनेक लोक एकत्र तबलावर आविष्कार दाखवत आहे. या व्हिडीओमध्ये तबल्यावर शिव तांडव धून वाजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल. 14 कलाकारांनी एकत्र शिव तांडवचं अद्भूत प्रदर्शन केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेक यूजर्स म्हणत आहेत की हा शिव तांडवाचा सगळ्यात उत्तम वर्जन आहे. 

शिव तांडव स्तोत्रम हे रावणाने भगवान शिवाच्या स्तुतीसाठी लिहिलं आणि गायलं होतं. आता हे स्तोत्र अनेक जण आपल्या शैलीत गात असतात. शिव तांडव स्तोत्रमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलतो आहे. एकाच शैलीत तबलावरील हे शिव तांडव म्हणजे एक अप्रतिम परफॉर्मन्स आहे. ही अप्रतिम जुगलबंदी लोकांचं मनं जिंकत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ गुजरातमधील असल्याचं बोलं जातं आहे. हा नेत्रदीपक असा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर indianmusicsouls नावाने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर 11 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केलं आहे. विशेष म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेवचा जप सुरु आहे.