स्टंट करायला गेला आणि तोंडावर पडला, पाहा व्हिडीओ

असे स्टंट करू नका! नाहीतर नक्की याचासारखं तोंडघाशी पडाल.... पाहा नेमकं काय घडलं? 

Updated: Dec 5, 2021, 09:55 PM IST
स्टंट करायला गेला आणि तोंडावर पडला, पाहा व्हिडीओ

मुंबई: घराच्या पार्किंगमध्ये स्कुटीवर स्टंट केल्याचा नुकताच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ताजा असतानाच आता अजून एक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण सायकलवर स्टंट करायला जातो आणि तोंडावर पडतो. 

अशा प्रकारचे स्टंट जीवावर बेतू शकतात हे माहीत असतानाही हा तरुण आपली जीव धोक्यात घालून स्टंट करायला गेला. मात्र हा स्टंट फसला आणि तरुण तोंडावर आपटला. स्टंट करताना या तरुणाच्या अंगावर सायकल पडते. दैव बलवत्तर म्हणून ते जीवावर बेतलं नाही. 

हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की तरुणाला सुरुवातीला पाहून असं वाटतं की तो स्टंट आरामात करेल, पण नंतर तो या स्टंट करण्यात फेल ठरतो. तो उभा असताना तो सायकलचे पुढचे चाक हाताने धरण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा पराक्रम फसतो आणि तो तोंडावर पडतो.

इंस्टाग्रामवर ragib_afzal या युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 1 लाख 34 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं आहे की, 'व्वा काय सीन', तर दुस-या युझरने मजेत असेही लिहिले आहे की जेव्हा ब्रेक फेल होतो.