धक्कादायक, या वाहन चालकाच्या ऑनलाईन कुंडलीसमोर बेचा पाढाही कमी पडला

एखाद्या व्यक्तीला किंवा वाहनचालकाला जास्तीत जास्त किती दंड लावला गेला असावा?

Updated: Nov 17, 2021, 04:02 PM IST
धक्कादायक, या वाहन चालकाच्या ऑनलाईन कुंडलीसमोर बेचा पाढाही कमी पडला title=

हैदराबाद : आपल्याकडे गाडी किंवा वाहन चालवण्यासाठी वेगवेगळी नियम लावले गेले आहेत. हे नियम जर का वाहनचालकाने मोडले तर त्याला त्याबदल्यात पावती फाडून पैसे भरायला लागतात. काही वेळेला ट्राफिक पोलिस चालकाला समोरासमोर थांबवून त्यांच्याकडून पैसे घेतात. तर काही वेळेला ऑनलाईन, कॅमेरा मार्फत देखील दंड लावले जातात. ज्यामुळे चालकाला बऱ्याचदा हे समजायला कठीण जाते की, त्याच्या गाडीवर दंड लावले गेले आहेत.

सर्वसामान्यता विचार करायचा झाला तर, तुम्हाला काय वाटतं, एखाद्या व्यक्तीला किंवा वाहनचालकाला जास्तीत जास्त किती दंड लावला गेला असावा? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एका व्यक्तीला  117 वेळा दंड लावला गेला आहे, ज्याची एकूण रक्कम जवळ-जवळ 30 हजार रुपयांच्या घरात आहेत.

हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी एका अशा वाहनचालकाला पकडले आहे, ज्याला सात वर्षात आतापर्यंत 117 वेळा दंड लावला गेला आहे. परंतू त्याने एकदाही त्याच्या दंडाची रक्कम भरलेली नाही. गेली सात वर्षे या दुचाकी चालकाने ही दंडाची रक्कम न भरता पोलिसांच्या नजरेतून वाचला आहे.

या दुचाकीस्वाराचे नाव फरीद खान आहे. त्याला पोलिसांनी नामपल्ली येथून विना हेल्मेट गाडी चालवताना पकडले. वाहतूक पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर जेव्हा त्याच्या गाडीचा नंबर अॅपवर टाकला तेव्हा पोलिसांनी धक्काच बसला. 

त्यांनी पाहिले की, हा व्यक्ती गेली 7 वर्षे पोलिसांना फसवत आहे. त्याने वाहतूकीचे एकूण 117 नियम मोडले आहे, ज्याची 29 हजार 720 रुपये रक्कम आहे जी, त्याने अद्याप भरलेली नाही.
त्यानंतर पोलिसांनी त्याची स्कूटर जप्त केली आणि सर्व दंड भरून वाहन नेण्यास सांगितले.

खानला यासाठी एक नोटीस पाठवण्यात आली ज्यामध्ये सांगितले गेले की, चलन भरा नाहीतर वाहन जप्त करण्यासाठी आरोपपत्र दाखल केले जाईल. 

वाहतूक नियमानुसार जर एखाद्याने 10 पेक्षा जास्त वेळाचे चलन भरले नसेल तर पोलिसांना ते जप्त करण्याचा अधिकार आहे. ई-चलन वेबसाईटनुसार 2014 पासून खानच्या गाडीला ज्या पावत्या फाडण्यात आल्या त्या विनाहेल्मेट आणि नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याच्या आहेत. कोरोना काळात काही चलन हे मास्क न लावल्याची आहेत. काही चलन ही राँग साईडने स्कूटर चालविल्याची आहेत.