शोएब म्हणाला पाकिस्तान जिंदाबाद, सानियाने अभिनंदन बद्दल केलं हे ट्वीट

 सानियाच्या या ट्वीटचे खूप कौतूक होत आहे. 

Updated: Mar 1, 2019, 08:49 PM IST
शोएब म्हणाला पाकिस्तान जिंदाबाद, सानियाने अभिनंदन बद्दल केलं हे ट्वीट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियामध्ये याबद्दल सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. दोन्ही देशातील सेलिब्रेटीही शब्दपुष्पांनी आपआपल्या सैनिकांचे मनोबल वाढवत आहेत. त्यांच्या अशा आशयाच्या पोस्टमुळे त्यांना ट्रोल देखील व्हावे लागत आहे. जेव्हा मुद्दा सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या बद्दल येतो तेव्हा अधिकच संवेदनशील होऊन जातो. 

बुधवारी पाकिस्तानी सैन्याने भारत विमानांची घुसखोरी केल्यानंतर शोएब मलिकने #PakistanZindabad असे ट्विट केले.

त्यावेळी त्याला भारतीयांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. अनेकांनी त्याला खूप काही सुनावले. या सर्वाचा परिणाम सानिया मिर्झा वर होणारच होता. सानिया मिर्झा या सर्व प्रकरणावर काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष होते. शुक्रवारी जेव्हा सारा देश अभिनंदन यांच्या घरवापसीच्या आनंदात होता. तेव्हा सानिया मिर्झाचा आनंदही गगनात मावत नव्हता. त्यावेळी सानियानेही अभिनंदन यांचे कौतूक करणारे ट्वीट केले.  विंग कमांडर अभिनंदन यांच्या घरवापसीचे स्वागत आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने देशाचे नायक आहात.

संपूर्ण देश तुमच्या बहादुरीला सलाम करतोय. जय हिंद. असे ट्वीट सानियाने केले. सानियाच्या या ट्वीटचे खूप कौतूक होत आहे.