Shraddha Murder Case: 'जेव्हा आफताब माझ्यासोबत असायचा तेव्हा...', आफताबविरोधात श्रद्धाची ऑडिओ क्लिप सादर

Shraddha Walkar Murder Case: 18 मे 2022 मध्ये हत्याकांड झाल्याचा संशय, त्यानंतर बरोबर 18 दिवसांनी काय घडलं? श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत. अशातच आता कोर्टात श्रद्धाच्या आवाजातील भितीदायक रेकॉर्डिंग सादर करण्यात आली. 

Updated: Mar 21, 2023, 02:59 PM IST
Shraddha Murder Case: 'जेव्हा आफताब माझ्यासोबत असायचा तेव्हा...', आफताबविरोधात श्रद्धाची ऑडिओ क्लिप सादर title=
Shraddha Walkar Murder Case

Shraddha Murder Case:  देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी (Shraddha Walkar Murder Case) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) दिल्ली पोलिसांनी कोर्टात आरोपी आफताबविरोधात (Aftab Amin Poonawala) सबळ पुरावे मिळाल्याचा दावा केला. आफताबला दोषी ठरवण्यासाठी हा पुरवा ठोस असल्याचे म्हणत पोलिसांनी 34 मिनिटांची ऑडिओ क्लीप कोर्टासमोर सादर केलं. त्यात आरोपी आफताबचा क्रूर चेहरा समोर आला आहे. या क्लिपमध्ये आफताबने तिला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला असं यामध्ये श्रद्धाने म्हटले आहे.  ही क्लिप श्रद्धाने मानसोपचार तज्ज्ञांशी केलेल्या संवादमधली आहे.  

"आफताबने मला वारंवार मारण्याची धमकी दिली होती. मला त्याने मारायला नको होते. काही समस्या असेल तर त्यावर बोलून सोडवायला हवा होत्या. तर मी असा व्यक्ती नाही असं आफताब म्हणत होता." असं श्रद्धाने मानसोपचार तज्ज्ञांना सांगत होती. मात्र या क्लिपमुळे श्रद्धा आणि आफताबचे ऑडिओ रेकोर्डिंगमुळे आफताब श्रद्धाला मारहाण करायला आणि श्रद्धा एकदा बेशुद्ध केले होते याचा खुलासा झाला.

वाचा : अनुपम खेर यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, ट्विटकरून लोकांना केलं आवाहन

आफताबची श्रद्धाला मारहाण 

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान असे समोर आले आहे, आफताब तिला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा, असा आरोप श्रद्धाने केला होता. आफताबने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि तिचे तुकडे करण्याची धमकीही दिली होती. दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की, श्रद्धाही फीओम प्रॅक्टो अॅपद्वारे डॉक्टरांकडून समुपदेशन घेत होती.

34 मिनिटांचे ऑडिओ क्लिपमध्ये सर्वकाही... 

श्रद्धा वालकर ही मानसोपचार तज्ज्ञांना तिची सर्वकाही कहानी सांगत होती. आफताबने कितीवेळा मला मारण्याचा प्रयत्न केला हे मला माहिती नाही. मात्र ही पहिली वेळ नाही जेव्हा त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. आज जवळपास दोनदा त्याने मला मारहाण केली. ज्यारितीने आफताबने माझी मान पकडली, माझ्या डोळ्यासमोर सर्व आंधार पसरला होता. मला 30 सेकंद श्वासही घ्यायला आला नाही. कसेतरी मी त्याचे केस ओढून स्वत:चा बचाव केला असं श्रद्धाने म्हटले आहे. ज्यावेळी आफताब माझ्यासोबत असायचा तेव्हा मी घाबरत जगत होती. तो मुंबईत माझ्या आसपास राहायचा. तो मुंबईत मला शोधून काढेल आणि मारण्याचा प्रयत्न करेल याची भीती मला कायम वाटायची. आफताबची वृत्ती मला मारण्याचा प्रयत्न करत होता ,असं श्रद्धा ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना ऐकायला येते.