Shraddha Murder Case : आताची मोठी बातमी, आफताबवर तलवारीने हल्ला

Shraddha Murder Case दिल्लीत मोठी घडामोड, आफताबला घेऊन जात असलेल्या पोलीस व्हॅनवर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न

Updated: Nov 28, 2022, 07:42 PM IST
Shraddha Murder Case : आताची मोठी बातमी, आफताबवर तलवारीने हल्ला title=

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या  प्रकरणात आताची मोठी बातमी. आरोपी आफताबवर (Aaftab Poonawala) हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतल्या रोहिणी इथल्या फॉरेंसिक लॅबच्या (Rohini Forensic Lab) बाहेर आफताबवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. आफताबला पोलीस व्हॅनने (Police Van) नेण्यात येत होतं. त्यावेळी काही लोकांनी हातातल तलवार घेऊन आफताबवर हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर हिन्दू सेनेचे (Hindu Sena) असल्याचं बोललं जात आहे.  पुढच्या वेळी आफताबला गोळ्या घालून ठार करु, असा इशारा हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. 

आफताब पुनावालाला आज पॉलीग्राफ टेस्टसाठी (Poligraph Test) दिल्लीतल्या रोहिणी इथल्या फॉरेंसिग लॅबमध्ये नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिथून आफताबला पुन्हा पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. त्याचवेळी काही लोकांनी हातात तलवार घेऊन आफताबला मारण्याच्या उद्देशाने पोलीस व्हॅनवर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोकं आधीपासूनच लॅबच्या बाहेर उभी होती. श्रद्धा वालकरच्या हत्येमुळे लोकांचा आफताबवर प्रचंड रोष आहे. 

आफताबचे ड्रग्स पेडलरशी संबंध
दरम्यान, श्रद्धा हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती आणखी एक मोठा पुरावा लागला आहे. ड्रग्स पेडलर फैझल मोमिनला सुरत पोलिसांनी अटक केलीय. हाच फैझल मोमिन श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताबला ड्रग्स पुरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. आफताबने अनेकदा फैझल मोमिनची भेट घेतल्याचाही पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. आफताब मोमिनकडून ड्रग्स घेत होता का याची चौकशी आता पोलीस करणार आहेत. फैझल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे फैझल मोमिनच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आफताबकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
श्रद्धा हत्या प्रकणात आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबने पुरावे नष्ट केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. श्रद्धाचा मोबाईल हा सर्वात मोठा पुरावा ठरू शकला असता. पण तोच मोबाईल आफताबने नष्ट केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रद्धाच्या मोबाईलमध्ये आफताबचा एक व्हिडिओ होता. श्रद्धाला हाच व्हिडिओ वाचवू शकला असता असा दावा श्रद्धाचा मित्र गॉडवीन याने केलाय. (aaftab poonawala-shraddha walker)

श्रद्धाच्या मोबाईलमधीला हा व्हिडीओ कोणाच्या तावडीत सापडू नये म्हणून आफताबने मोबाईलमधला सर्व डेटा डिलीट मारल्याचा संशय पोलिसांना आहे. शिवाय मोबाईलमधला सर्व डेटा डिलीट मारल्यानंतर आफताबने फॅक्टरी रिसेट मारल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ( delhi shraddha case) एवढंच नाहीतर, श्रद्धाचं सीमकार्डही आफताबनं नष्ट केलं. 20 ते 23 ऑक्टोबरदरम्यान भाईंदरच्या खाडीत त्याने हा मोबाईल फेकल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.