Constitution Day 2022 : भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणी लिहिली माहितीये? 95 % वाचकांनी दिलं चुकीचं उत्तर

Constitution Day 2022 : (India)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Bababsaheb Ambedkar) यांच्यामुळं एक प्रजासत्ताक राष्ट्र (Republic nation) म्हणून देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. 

Updated: Nov 26, 2022, 06:42 AM IST
Constitution Day 2022 : भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणी लिहिली माहितीये? 95 % वाचकांनी दिलं चुकीचं उत्तर  title=
Constitution Day 2022 know the interesting facts and ssignificance of indian constitution

Constitution Day 2022 : जागतिक स्तरावर (World) भारतानं (India) एक प्रजासत्ताक (Republic Nation ) राष्ट्र म्हणून कमालीची वाटचाल केली आहे. गतकाळातून शिकवण घेत, नव्या दिशेनं जाताना उराशी असंख्य आशा बाळगत या देशाचा प्रवास अद्यापही सुरुच आहे. पण, याच प्रवासाचा पाया घालणाऱ्यांना विसरुन चालणार नाही. कारण, त्यांनी केलेल्या अद्वितीय कामाच्या आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाच्याच बळावर आज भारताची वेगळी ओळख आहे. 

हेसुद्धा वाचा : PMKSY योजनेत मोठा बदल, पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

 

आज, संविधान दिवस. प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताची जागतिक स्तरावर ओळख करुन दिली ती म्हणजे देशाच्या संविधानानं. याचं सर्वाधिक श्रेय जातं ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना. पण, बाबासाहेबांव्यतिरिक्तही काही व्यक्तींनी या संविधानासाठी योगदान दिलं. भारताला लोकशाही (Democracy) आणि एक सार्वभौम राष्ट्र अशी ओळख देणाऱ्या या संविधानाविषयीची खास माहिती एकदा पाहाच. (Constitution Day 2022 know the interesting facts and ssignificance of indian constitution )

  •  लिखित स्वरुपातील सर्वाधिक तरतुदी असणारं हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे. 
  • (Indian constitution) भारतीय संविधानाच्या हिंदी आणि इंग्रजी प्रतींचं टंकलेखन करण्यात आलं नव्हतं. 
  • संविधानाची मूळ प्रत ही इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिली गेली होती. परिणामी संविधानावर स्वाक्षरी करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या दोन प्रतींवर स्वाक्षरी करावी लागली होती. 
  • संविधानाची मूळ प्रत कुणी लिहिली असं विचारलं असतासुद्धा बरेचजण उथळपणे बाबासाहेबांचं नाव घेतात. पण, ते मोठी चूक करतात. कारण, संविधानाची मूळ प्रत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात लिहिली गेली होती. 
  • इटालिक प्रकारच्या सुलेखन प्रकारात त्यांनी संविधान शब्दबद्ध केलं होतं. त्याचं प्रकाशन देहरादूनमध्ये करण्यात आलं तर, photolithograph 'सर्व्हे ऑफ इंडिया'कडून करण्यात आलं होतं. 
  • हस्तलिखित संविधानात असणारं प्रत्येक पान हे शांतीनिकेतनमधील कलाकारांनी सुशोभित केलं होतं. 
  • तुमचा विश्वास बसणार नाही, पण संपूर्ण संविधान तयार होण्यासाठी साधारण 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला होता. तर संविधानाचा अंतिम मसूदा ठरवण्यापूर्वी त्यात किमान 2 हजार सुधारणा करण्यात आल्या होत्या. 
  • भारतीय संविधानाच्या इंग्रजी प्रतीमध्ये 1,17,369 शब्द आहेत. ज्यामध्ये 22 भागांमध्ये 444 कलमं आहेत.
  • भारतीय संविधानाची दुसरी ओळख म्हणजे 'Bag of Borrowings'. अनेक राष्ट्रांच्या संविधानातील काही तरतुदींचा आधार घेत त्या आधारे भारतीय संविधानातील तरतुदी तयार करण्यात आल्यामुळे त्याचा उल्लेख 'Bag of Borrowings' असाही करतात.  
  • संविधानाची हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मूळ प्रत संसदेतील ग्रंथालयात असणाऱ्या एका पेटीत आजही जपून ठेवण्यात आली आहे.