श्रीनिवास पाटील यांनी संसदेत घेतली खासदारकीची शपथ

राष्ट्रवादीचे लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य श्रीनिवास पाटील यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतली. 

Updated: Nov 18, 2019, 04:35 PM IST
श्रीनिवास पाटील यांनी संसदेत घेतली खासदारकीची शपथ  title=

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य श्रीनिवास पाटील यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतली. कराड - सातारा लोकसभा मतदार संघातून त्यांनी राष्ट्रवादीकडून पोटनिवडणूक लढवली होती. भाजपकडून उभे असलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांना त्यांनी पराभूत केले आहे. 

श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांना ८७ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यांना जवळपास ६ लाखांहून अधित मत मिळली. यापूर्वी दोनवेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. दरम्यान, श्रीनिवास पाटील यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. 

भाजपच्या मेगाभरतीत साताऱ्याचे माजी खासदार उद्यनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. तर राष्ट्रवादीने आपली जागा कायम राखावी यासाठीही जोर लावला होता. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या ठिकाणी दोन सभा घेतल्या. त्यातही प्रचार संपायच्या शेवटच्या त्यांनी शेवटची सभा घेतली. सभा महत्वाची ठरली. भर पावसात सभा घेतल्याने त्याचा प्रभाव पडल्याचे जोरदार चर्चा झाली.