मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याचे हत्या प्रकरण सध्या खुप चर्चेत आहे. या हत्या प्रकरणात तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचे समोर आलेय. या प्रकरणात सध्या चौकशी सुरु आहे. मात्र तुम्हाला माहितीय का, तिहार तुरूंगात अनेक हायप्रोफाईल कैद्याने ठेवले जाते. या हायप्रोफाईल कैद्यांवर नजर ठेवणारा पोलिस अधिक्षक काय साधासुधा माणूस नाही आहे. तर तिहार जेलचा कारभार एक दबंग पोलिस पाहतो. या पोलिसाबद्दलची माहिती तूम्हाला देणार आहोत.
दिल्लीतील तिहार तुरुंग हे अनेक हायप्रोफाईल प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत असते. या तिहार तुरुंगातील जेल क्रमांक 3 ची जबाबदारी सहाय्यक पोलिस अधीक्षक दीपक शर्मा यांच्या खांद्यावर आहे. यापूर्वी दीपक शर्मा हे दिल्लीच्या मंडोली कारागृहाचे उप तुरुंग अधीक्षक होते. निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीच्या वेळी त्यांची नियुक्ती तिहार तुरूंगात झाली होती.
सलमानच्या सिनेमातून घेतली प्रेरणा
एका मुलाखतीत दीपक शर्माने सांगितले होते की, २००९ मध्ये पोलिसात रुजू झालो होतो. त्यानंतर जेव्हा मी सलमान खानचा दबंग चित्रपट पाहीला. या चित्रपटातील सलमानच्या बॉडीपासून प्रेरीत होत, बॉडी बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने बॉडी बिल्डींगच्या अनेक स्पर्धाही खेळत स्वत:च एक वेगळी ओळख निर्माण केली.
कैदी दहशतीखाली
दीपक आता तिहार तुरूंगात कर्तव्यावर आहे. सध्याची त्याची बॉडी पाहून अनेक कैदी त्याच्या दहशतीखाली आहेत.दीपकची छाती सुमारे 48 इंच आणि डोला (बायसेप्स) 19 इंच आहे. अशी ही त्याची फिट बॉडी पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो.
बॉडी बिल्डिंग स्पर्धा
दीपक शर्मा एक व्यावसायिक बॉडी बिल्डर असून त्यांनी अनेक बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धाही जिंकल्या आहेत.दीपकने 2014 मध्ये व्यावसायिक बॉडीबिल्डर म्हणून पहिली स्पर्धा लढवली होती. यानंतर त्याने आतापर्यंत अनेक विजेतेपद पटकावले आहेत. दीपक शर्मा यांच्याकडे मिस्टर यूपी, आयर्न मॅन ऑफ दिल्ली (सिल्व्हर), मिस्टर हरियाणा, मिस्टर दिल्ली, स्टील मॅन ऑफ इंडिया (सिल्व्हर मेडल) अशा अनेक पदव्या आहेत.
पोलीस विभागातून मिळाली सुट
व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू असल्याने दीपकला पोलिस विभागातून काही तासांसाठी ड्युटीतून सूटही मिळते. पण ड्युटीसोबतच फिटनेसवर लक्ष केंद्रित करणं खूप अवघड होऊन बसतं. मात्र तरीही २४ तासांत किमान ३-४ तास वर्कआउटसाठी काढतो, असेही त्याने एका मुलाखतीत म्हटलेय.