नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात उपचार सुरू होते, पोटाच्या विकारामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सोनिया गांधी यांना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनिया गांधी शिमल्याला सुट्टीसाठी गेल्या होत्या, मात्र त्यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागला.
यानंतर सोनिया गांधींना तातडीने दिल्लीत आणले गेले. दिल्लीत त्यांना सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते.
आज त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. सोनिया गांधी यांना डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला देखील दिला आला आहे.