देह व्यापार आणि मानव तस्करी प्रकरणात सोनू पंजाबनला 24 वर्षांची शिक्षा

सोनू पंजाबनला पोक्सो (POCSO) कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

Updated: Jul 22, 2020, 06:01 PM IST
देह व्यापार आणि मानव तस्करी प्रकरणात सोनू पंजाबनला 24 वर्षांची शिक्षा title=

नवी दिल्ली : 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण, देह व्यापार आणि मानव तस्करी प्रकरणात सोनू पंजाबनला 24 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. (Sonu Punjaban) ला दिल्लीच्या द्वारका कोर्ट (Dwarka Court) ने 24 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोनू पंजाबनसह तिचा आणखी एक साथीदार संदीप बेदवालला द्वारका कोर्टाने बलात्कार, अपहरण आणि मानव तस्करी प्रकरणात 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

सोनू पंजाबनला पोक्सो (POCSO) कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी संबंधित हे प्रकरण आहे. ज्यामध्ये. दोषी संदीप बेदवालने 2009 मध्ये या अल्पवीयन मुलीला प्रेमात फसवून लग्नाचं आमिष दाखवून सीमा नावाच्या एका महिलेकडे घेऊन गेला.

अल्पवयीन मुलीच्या माहितीनुसार संदीपने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला सीमा नावाच्या महिलेला विकून निघून गेला. सीमाने या मुलीला जबरदस्ती देहव्यापार करण्यासाठी भाग पाडलं. या मुलीली अनेकदा विकलं गेलं. सोनू पंजाबनने देखील या मुलीला पैसे देऊन खरेदी केलं. या प्रकरणात पोलीस आणखी काही लोकांचा शोध घेत आहेत. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.