मध्यमवर्गीयांसाठी खुषखबर ! केवळ इतक्या रुपयांत हेल्‍थकेयर स्‍कीम

 देशातील मध्यमवर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार एक मोठे पाऊल उचलत आहे.

Updated: Nov 19, 2019, 03:13 PM IST
मध्यमवर्गीयांसाठी खुषखबर ! केवळ इतक्या रुपयांत हेल्‍थकेयर स्‍कीम title=

नवी दिल्ली : देशातील मध्यमवर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार एक मोठे पाऊल उचलत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यमवर्गाचे आरोग्य अधिक सक्षम बनविण्यासाठी सरकारतर्फे हेल्थकेयर योजना आणली जाणार आहे. मध्यम वर्गीय आता आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. 

सरकारच्या थिंक टॅंक म्हणजेच नीती आयोगाने यासंदर्भात विशेष योजनेचा अहवाल तयार केला आहे. निती आयोगाने 'हेल्थ सिस्टिम फॉर न्यू इंडिया' अहवाल तयार केला आहे. आयुष्यमान योजना देशातील गरीबांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहे. पण मध्यम वर्गीयांसाठी कोणतीही ठोस हेल्थकेअर योजना नव्हती असे सरकारचे मत होते. 

यामुळे सरकारतर्फे आता लवकरच नवी योजना आणण्यात येत असून ती मध्यम वर्गीयांवर केंद्रीत आहे. ठरल्याप्रमाणे सर्वकाही झाल्यास देशातील मध्यमवर्गीयांना येणाऱ्या काळात २०० ते ३०० रुपये प्रिमियममध्ये चांगल्या वैद्यकीय सुविधांचा फायदा घेता येणार आहे. उच्च वर्ग हा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम असल्याचे नीती आयोगाचे म्हणणे आहे.