उत्तरप्रदेश पोटनिवडणूक निकाल : उत्तरप्रदेशमध्ये दोन्ही जागेवर भाजप पिछाडीवर

उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभेच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक पार पाडली. या निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. गोरखपूर आणि फुलपूरमधून सपाच उमेदवार आघाडीवर आहे. सुरूवातीला आघाडी घेतलेल्या भाजपसाठी हे धक्कादायक मानलं जात आहे. 

Updated: Mar 14, 2018, 01:43 PM IST
उत्तरप्रदेश पोटनिवडणूक निकाल : उत्तरप्रदेशमध्ये दोन्ही जागेवर भाजप पिछाडीवर title=

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभेच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक पार पाडली. या निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. गोरखपूर आणि फुलपूरमधून सपाच उमेदवार आघाडीवर आहे. सुरूवातीला आघाडी घेतलेल्या भाजपसाठी हे धक्कादायक मानलं जात आहे. 

गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागा भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झालीय. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने फुलपूरची जागा रिकामी झालीय. 

गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उपेंद्र दत्त शुक्ला आणि फुलपूमधून कौशलेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवारा पाठिंबा दिला असून काँग्रेस स्वबळावर लढलीय. मात्र मतदान कमी प्रमाणात झाल्याने राजकीय पक्षांची पुरती झोप उडालीय.