धोकादायक ओमायक्रॉनची एंट्री, भारतीयांनाही मिळणार बूस्टर डोस?

ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत.

Updated: Dec 6, 2021, 10:12 PM IST
धोकादायक ओमायक्रॉनची एंट्री, भारतीयांनाही मिळणार बूस्टर डोस?

मुंबई : ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत. या व्हेरियंटपुढं सध्याच्या लसी कुचकामी ठरत असल्यानं तिसरा बुस्टर डोस देण्याची मागणी केली जात आहे.खरंच बुस्टर डोसची गरज आहे? भारतातही बुस्टर डोस देणार? या रिपोर्टमधून आपण जाणून घेणार आहोत. 

ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटची भारतात एन्ट्री झाली आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्यानं वाढतायेत. त्यामुळं घबराट देखील पसरलीय.

भारतातील अनेक गर्भश्रीमंत, अब्जाधीश, बड्या कंपन्यांचे बॉसेस, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हज कोरोनाच्या बूस्टर डोससाठी अमेरिका, ब्रिटन आणि दुबई अशा देशांमध्ये धाव घेतायत. या पार्श्वभूमीवर भारतीय लोकांना देखील बूस्टर डोस देण्याबाबत सरकार पातळीवर विचारविनिमय सुरू झाला आहे.

दोन डोस घेतलेल्या 50 वर्षांवरील प्रौढांना बूस्टर डोस दिला जाणा आहे. ओमायक्रॉनचा धोका असलेल्या लोकांना प्राधान्यानं बूस्टर डोस दिला जाईल. कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांनाही बूस्टर डोस दिला जाईल. त्याशिवाय 18 वर्षांखालील मुलांसाठीही कोरोना लसीकरण सुरू केलं जाणार आहे.

आता आयएमएनं देखील पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस  आणि लहान मुलांना कोरोना लस देण्याची मागणी केलीय.  

जगभरातील विविध देशांनी ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन बूस्टर डोस द्यायला सुरूवात केली आहे. भारतानंही लवकरच याबाबतचं स्पष्ट धोरण ठरवावं, अशी अपेक्षा आहे.