फक्त ४२ सेकंदात youtuber ने कमावले १ कोटी ७५ लाख रुपये; जाणून घ्या कसे?

एका युट्यूबरने ४२ सेकंदात १ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. जोनाथन मा नावाच्या युट्यूबरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Updated: Feb 18, 2022, 11:54 AM IST
फक्त ४२ सेकंदात youtuber ने कमावले १ कोटी ७५ लाख रुपये; जाणून घ्या कसे? title=

नवी दिल्ली : एका युट्यूबरने फक्त ४२ सेकंदात १ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. जोनाथन मा नावाच्या युट्यूबरची सोशलमीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

४२ सेकंदात कोट्यवधींची कमाई

जोनाथनबाबत चर्चा सुरू असण्याचे कारण म्हणजेच, त्यांनी ४२ सेकंदात १ कोटी ७५ लाखांची केलेली कमाई होय. जोनाथन यांना कर वेगैरेची रक्कम कपात करून १ कोटी ४० लाख रुपये मिळाले आहेत.

NFT  च्या माध्यमातून कमाई

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार जोनाथन मा ने आपला एनएफटी कलेक्शन जारी केले आहे. फिल्ममेकर बनायची त्यांची इच्छा आहे. त्यांनी एनएफटी कलेक्शनसाठी डिस्कॉर्ड सर्वर बनवले होते. जेथे एकसारखे सर्वर असलेले लोकं, त्यांचे एनएफटी कलेक्शन पाहू शकत होते. 

कोण आहेत जोनाथन मा?

जोनाथन मा फुलटाइम युट्यूबर बनन्याआधी फेसबुक आणि गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. सध्या ते युट्यूबवर कॉम्यूटर प्रोग्रामिंग, क्रिप्टो आणि टेक्नॉलॉजी संदर्भात व्हिडिओ बनवतात. त्यांच्या युट्यूब चॅनेलचे 16 लाखाहून अधिक सब्सक्राइबर आहेत. जोनाथन यांचे उद्दिष्ट फिल्म डायरेक्टर बनन्याचे आहे. 

जोनाथनला सूचली कल्पना

मागील वर्षी 18 हजार कोटीहून जास्त एनएफटीची विक्री झाली आहे. जोनाथन युट्यूबवर व्हिडिओ बनवतात, त्यामुळे त्यांना कल्पना सुचली की, आपले कलेक्शन लॉंच केल्यास सब्सक्राइबर ते विकत घेतील. 

NFT म्हणजे काय ?

जोनाथन मा यांनी महिन्याच्या सुरूवातीला आपले कलेक्शन 'Vaxxed Doggos'रिलिज केले.  NFT म्हणजे Non-Fungible Token होय.

NFT एक डिजिटल आयटम आहे. जे ब्लॉकचेन  टेक्नॉलॉजीचा उपयोग करून खरेदी आणि विक्री करू केले जाते. क्रिप्टोकरंसी आणि एनएफटी  स्पेशलाइज्ड प्लॅटफॉर्मवर खरेदी - विक्री केले जाते.