Spicejetची धमाकेदार ऑफर! फक्त 999 रुपयांत करा विमानप्रवास, बुकिंग सुरू

स्पाईसजेट (Spicejet) ही एक माफक दरात विमानसेवा देणारी कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच धमाकेदार ऑफर देत असते

Updated: Jun 25, 2021, 08:40 PM IST
Spicejetची धमाकेदार ऑफर! फक्त 999 रुपयांत करा विमानप्रवास, बुकिंग सुरू

नवी दिल्ली : स्पाईसजेट (Spicejet) ही एक माफक दरात विमानसेवा देणारी कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच धमाकेदार ऑफर देत असते. स्पाईसजेटने ग्राहकांसाठी आता नवीन ऑफर आणली आहे. फक्त 999 रुपयांमध्ये तुम्ही विमानप्रवास करू शकता. स्पाईसजेट आपल्या मेगा मान्सून सेलच्या ऑफरअंतर्गत ऑफर देत आहे. स्पाईसजेटचा हा ऑफर काळ 1 ऑगस्ट 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. या ऑफरसाठी आज म्हणजेच 25 जून पासून बुकींग सुरू झाली आहे. ज्या व्यक्तीला या ऑफरचा आनंद घ्यायचा असेल त्यांना 30 जून 2021 पर्यंत टिकिट बुक करणे गरजेचे आहे.

फ्री फ्लाइट वाउचर

स्पाईसजेटचे टिकिट बुक केल्यानंतर फ्री फ्लाइट वाउचर मिळणार आहे. प्रवासी या वाउचरचा वापर करून 1 ऑगस्टपासून विमानप्रवासासाठी वापरू शकतात. 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत फ्री प्लाइट वाउचर वैध असणार आहे. याशिवाय ऍड ऑन ऑफरच्या अंतर्गत प्रवासी 149 रुपयांत आपले आवडते आसन आरक्षित करू शकणार आहेत.

इंडिगो आणि विस्ताराची देखील ऑफऱ
इंडिगो आणि विस्तार विमानसेवेसाठी चांगल्या ऑफर देत आहेत. दोन्ही कंपन्यांचे सेल गुरूवार पासून सुरू होणार आहेत. इंडिगो आणि विस्तार यांची ऑफर 1 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबरपर्यंत प्रवासासाठी वैध असणार  आहे. या ऑफरनुसार दिल्ली ते इंडिगोच्या दरम्यानचे भाडे 1099 रुपये असणार आहे. दिल्ली ते लखनऊ 1600 रुपये असणार आहेत.