मुंबई : एखाद्या राष्ट्राचे अध्यक्ष आले की एखादा करार होता, मग आपले आणि त्या देशाचे प्रमुख एकमेकांना शेकहँड करतात.... एखादी संयुक्त पत्रकार परिषद होते.... आणि दौरा संपतो..... पण सध्या भूतानचा राजा भारतात आलाय.... पण त्याचा दौरा मात्र खूप आकर्षक ठरतोय....
भूतानचा राजा आणि त्याचं कुटुंब चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहे. भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक त्याची पत्नी आणि महाराणी जेटसन पेमा वांगचुक आणि प्रिंस ग्यालसे अशी ही रॉयल फॅमिली सध्या भारतात पाहुणे म्हणून आलीय. या सगळ्या दौ-यात सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरलाय तो छोटा प्रिन्स ग्यालसे.... भूतानचा राजा, राणी यांच्यापेक्षाही ग्यालसेच लोकप्रिय ठरल्याचं राष्ट्रपतींनीच म्हंटलंय.
प्रिन्स ग्यालसे त्याच्या आई-बाबांबरोबर भारताताल्या दिग्गजांची भेट घेतोय.... पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भूतानच्या या रॉयल फॅमिलीचं स्वागत केलं..... प्रिन्स ग्यालसेला शेकहँड करण्यासाठी त्यांनी हात पुढे करताच छोट्या ग्लालसेनं मात्र मोदींना नमस्कार केला.... आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून खेळतानाही पुन्हा मोदींनी ग्यालसेसाठी हात पुढे केला. तेव्हाही त्यानं नमस्कारच केला.... मग मोदीही त्याच्याशी खेळू लागले. फिफा अंडर 17 या स्पर्धेचा फुटबॉलही मोदींनी ग्यालसेला दिला.... मग मोदीही लहान मूल होऊन त्याच्याशी खेळायला लागले. मोदींनी त्याला एक बुद्धिबळाच्या खेळाचा सेटही दिला.....
मोदींच्या भेटीनंतर भूतानची रॉयल फॅमिली परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या भेटीसाठी गेली... त्याहीवेळी सगळ्यांच्या नजरा ग्यालसेवरच होत्या.... सुषमा स्वराजांनीही ग्यालसेला एक भेट दिली..... पण त्यात खेळणं नव्हतं... त्यामुळे ग्यॅलसेनं त्यात फार काही इंटरेस्ट दाखवला नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ग्यॅलसेला गिफ्ट दिलं. त्यात एक चॉकलेटचा बॉक्सही होता.... एरवी कुठल्याही राष्ट्राचे अध्यक्ष आले तरी शेकहँड आणि नमस्काराचे अगदीच औपचारिक सोहळे पाहायला मिळतात.... पण भूतानचा प्रिन्स ग्यालसेच्या येण्यानं भूतानच्या रॉयल फॅमिलीचा हा सोहळा देखणा आणि गोंडस झाला.