'ही' गोष्ट तुमच्याकडे नसेल तर अयोध्येत जाऊनही मिळणार नाही रामलल्लाचे दर्शन; अत्यंत महत्वाचा पुरावा

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. तर अयोध्यानगरीही पूर्णपणे सजून गेली आहे. मंदिराला चोहोबाजूंनी नयनरम्य रोषणाई करण्याचं काम सुरू आहे. 

Updated: Jan 19, 2024, 08:50 PM IST
'ही' गोष्ट तुमच्याकडे नसेल तर अयोध्येत जाऊनही मिळणार नाही रामलल्लाचे दर्शन; अत्यंत महत्वाचा पुरावा title=

Ayodhya Ram Mandir News:   22 जानेवारीला अयोध्येत रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजण या सोहळ्याला जाण्यासाठी तसेच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्याचे दर्शन घेण्यासंदर्भात सक्तीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याबाबत माहिती दिली आहे. 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश आणि जगातील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्व पाहुण्यांसह येथे येणाऱ्यांना प्रत्येकांना विशिष्ट प्रकारचे प्रवेश पास बनवावे लागणार आहे. या प्रवेश पास वरील QR कोड स्कॅन करुन भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे.  

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी हा प्रवेश पास जारी केला आहे.एंट्री पासमध्ये दिलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. एंट्री पासचा फोटो श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा प्रवेश पास असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जाईल. पास नसेल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. हा प्रवेश पास कसा आहे याचा फोटो श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मिडियावर शेअर केला आहे.  राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7,000 हून अधिक लोकांना मिनंत्रण देण्यात आले आहे. यात पुजारी, देणगीदार आणि अनेक राजकारण्यांसह 3,000 व्हीव्हीआयपींचा समावेश आहे.

राममंदिर प्राणप्रतिष्ठा पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट 

आयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्यात. त्याचाच भाग म्हणून मनमाड रेल्वे स्थानकात मॉकड्रिल करण्यात आलं. पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, श्वान पथक, बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधून ते निकामी करून दहशतवाद्याला जेरबंद करण्यात आलं. 

नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला मिळाला श्रीरामाची पूजा करण्याचा मान

22 जानेवारीला अयोध्येत रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय. यासाठी नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला श्रीरामाची पूजा करण्याचा मान मिळालाय. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे असं या दाम्पत्याचं नाव आहे. पूजेचं निमंत्रण आल्यानंतर या दाम्पत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

दो धागे श्रीराम के लिए म्हणत 12 लाख पुणेकरांनी तयार केलेलं वस्त्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. हा कार्यक्रम लखनऊत योगींच्या घरी झाला. स्वामी दयानंदपुरींच्या हजेरीत ही वस्त्रे सुपूर्द करण्यात आली. मागच्या ८ महिन्यांपासून हे काम सुरू होतं. अनघा काहीसास यांनी तयार केलेलं वस्त्र रामाला परिधान केलं जाणाराय.