मुंबई : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. घरबसल्या अनेक बँक व्यवहार हे कुठूनही करता येतात. ऑनलाईन बँकिगमुळे खातेधारकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो. मात्र ऑनलाईन शॉपिंगमध्ये फ्रॉड होण्याचीही शक्यता असते. आतापर्यंत अनेकांना विविध लिंक फोन कॉलद्वारे गंडा घातल्याच्या घटना घडल्या आहेत. सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खातेधारकांना या सायबर फ्रॉडपासून दूर ठेवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने सिक्योरिटी फीचर आणलं आहे. ज्यामुळे व्यवहार करणं आणखी सुरक्षित होणार आहे. तसेच यामुळे सायबर गुन्हेगारीला आळा बसेल.
सिम बाईंडिंग (Sim Binding) असं या फीचरचं नाव आहे. एसबीआयचा योनो (SBI YONO) अॅप आहे. या नव्या फीचरमुळे या अॅपमध्ये लॉगीन प्रक्रियेतही बदल झाले आहेत. एसबीआयच्या खातेधारकांना याबाबत जाणून घ्यायला हवं. (State bank of india introducing new yono sbi sim binding feature with enhanced security know how to login)
आतापर्यंत एसबीआयच्या योनो अॅपमध्ये बँकेने दिलेल्या लॉगीन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने करता येत होतं. तसेच खातेधारकानं तयार केलेल्या लॉगीन-पासवर्डद्वारेही लॉगीन करता येत होतं. मात्र आता सिम बाइंडिग फिचरमुळे संपूर्ण लॉगीन प्रक्रियेतच बदल झाला आहे. खातेधारकाला या फीचरचा वापर करण्यासाठी मोबाईल नंबरसह सिमकार्डही व्हेरीफाय करावं लागणार आहे. यानंतर योनो काम करेल. नोंदणीकृत नंबर असलेल्या मोबाईलमध्येच हा एसबीआय योनो अॅप डाऊलनोड करावा. अॅप उघडल्यानंतर एक सिस्टम जनरेटेड मेसेज प्राप्त होईल.
सिम बाइंडिगमुळे नो टेन्शन
जनरेटेड मेसेज मिळाल्यानंतर लॉगीन करुन अॅप ओपन करावा. सिम बाइंडिगमुळे ऑनलाईन आर्थिक फसवणूकीची शक्यता राहत नाही. तसेच बँक खातं आणखी सुरक्षित होण्यास मदत होते. यामुळे कोणालाही बँक खात्याचा एक्सेस मिळणार नाही. तसेच एखाद्याला लॉगीन आणि पासवर्ड माहिती झाल्यानंतरही लॉगीन करता येणार नाही. कारण खातेधारकाचं मोबाईल आणि रजिस्टर्ड नंबर हा कनेक्ट असतो. ज्याची नोंद ही बँकेकडे असते.
खातेधारकाच्या मोबाईलमध्ये आधीपासूनच अॅप असल्यास तो अपडेट करुन घ्यावा. त्यानंतर खातेधारकाला सिम बायडिंग फीचरचं अभय मिळेल. खातेधारकांना सिम बायंडिंगनंतर एमपिन जनरेट करावा लागेल. यानंतर सर्व ऑनलाईन बँकिंग सेवेचा लाभ घेता येईल.
खातेधारकांची सुरक्षितता
सिम बाइंडिंग पूर्णपणे एक सिक्योरिटी फीचर आहे. एसबीआयने सायबर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर खातेधारकांसाठी हा फीचर लॉन्च केला आहे. योनो अॅप खातेधारकाचा सिम कार्डची पडताळणी करतं. बँकेत खात्याशी रजिस्टर्ड मोबाईल नंबर असतो.बँकेकडे नोंद असलेल्या मोबाईल नंबरवरुन योनो अॅप डाऊनलोड तर होईल. मात्र सिम कार्ड व्हेरिफाय करता येणार नाही. त्यामुळे त्या योनो अॅप डाऊनलोड करण्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अॅप डिलीट करावा लागेल.
अनेकदा एकाच मोबाईल नंबरवर अनेक बँक खाते लिंक असतात. अशा वेळेस खातेधारकाने लॉगीन करताना तोच मोबाईल नंबर एंटर टाकावा, जो योनो अॅपमध्ये देण्यात आलेला आहे. सोबतच जन्मतारीखही द्याावी लागेल.
एसबीआयचे योनो आणि योनो लाईट हे दोन अॅप आहेत. हे दोन्ही अॅप मोबाईल फोन वन यूजर वन आरएमएन या तत्वावर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एका रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन एकच योनो अॅप ऑपरेट करता येईल. सिम बाइंडिग फीचरनुसार, खातेधारक एकाच मोबाईलमधून 2 स्वतंत्र नंबरवरुन योनो आणि योनो लाईट अॅप वापरु शकतो.
सिम कार्ड व्हेरीफिकेशन झाल्यानंतर या दोन्ही अॅपवर सायबर फ्रॉडपासून होणारी फसवणूक टाळण्यासाठी काय कराव, याबाबतचे माहिती मिळू शकते. यामुळे खातेधारक ऑनलाईन व्यवहार बिंधास्तपणे आणि आणखी सुरक्षितपणे करु शकतील.
सिम व्हेरीफिकेशन कसं कराल?
प्ले स्टोरवरुन योनो लाईट आणि योनो अॅप डाऊनलोड करुन ओपन करावं.
मोबाईल 2 सिम कार्ड असतील तर एसबीआयसोबत नोंदणी करण्यासाठी सिम कार्ड स्लॉट निवडावा लागेल.
यानंतर मोबाईल नंबरवर एक मेसेज मिळेल. त्यानुसार एक एसएमएस करावा लागेल.
त्यानंतर Proceed ऑप्शनवर क्लिक करावं. त्यानंतर एक यूनिक कोड प्राप्त होईल.
यानंतर यूझरनेम आणि पासवर्ड एंटर करुन लॉगीन करावं लागेल. पुढे रजिस्टर या पर्यायवर क्लिक करा. त्यानंतर ओके करा.
ओके केल्यानंतर एक्टिवेशन कोड मिळेल. एक्टिवेशन कोड टाकावा लागेल.