दिल्लीतल्या हनुमानाला घडणार हवाई सफर

दिल्लीतल्या हनुमानाचा पुतळा हवाई साधनांचा वापर करून हटवण्यात यावा, असं दिल्ली उच्च न्यायालयाने सुचवलयं.

Updated: Nov 21, 2017, 03:56 PM IST
दिल्लीतल्या हनुमानाला घडणार हवाई सफर title=

नवी दिल्ली : दिल्लीतल्या हनुमानाचा पुतळा हवाई साधनांचा वापर करून हटवण्यात यावा, असं दिल्ली उच्च न्यायालयाने सुचवलयं.

दिल्ली उच्च न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयात करोल बाग परिसरातील बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर दिल्लीतल्या हनुमानाचा पुतळा हवाई साधनांचा वापर करून हटवण्यात यावा, असं दिल्ली उच्च न्यायालयाने सुचवलयं. 

भव्य हनुमान

दिल्लीतल्या करोल बागेत हनुमानाचा 108 फुटी पुतळा आहे. हा पुतळा अतिशय मोक्याच्या जागी उभारण्यात आलाय. त्याच्या आकारामुळे त्याला खूप प्रसिद्धीही मिळाली आहे.

अमेरिकेचं अनुकरण करा

अमेरिकेत आवश्यकता असल्यास गगनचुंबी इमारती उचलल्या जात असल्याचा संदर्भ न्यायालयाने यावेळी दिला. महानगर पालिकांना वारंवार संधी देउनसुद्धा ते यावर कारवाई करत नसल्याचे ताशेरे यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने ओढले.

चौकशी करा

पोलिस आणि बांधकाम खात्याचे इंजिनियर यांना बेकायदेशीर पुतळा उभारणारे आणि त्याला अर्थपुरवठा करणाऱ्यांच्यासंदर्भात  दिल्ली उच्च न्यायालयाने चौकशी अहवाल सादर करायची सूचना केलीय. 

या खटल्याची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी आहे.