Investment | ऑटो आणि फार्मा सेक्टरमधील या दमदार शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला; लाखोंच्या कमाईची संधी

मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी दोन दमदार शेअर्सची निवड केली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही शॉर्ट टर्म तसेच लॉंग टर्मसाठी चांगला परतावा मिळवू शकता.

Updated: Jan 6, 2022, 06:19 PM IST
Investment | ऑटो आणि फार्मा सेक्टरमधील या दमदार शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला; लाखोंच्या कमाईची संधी title=

मुंबई : कोरोनाच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आधीच खूप वाढली आहे. गेल्या 2 वर्षात लाखो डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. तुम्ही देखील शेअर बाजारात गुंतवणूक  करण्याचा विचार करत असाल. तर बाजार मार्केट एक्सपर्टने तुमच्यासाठी दोन मजबूत शेअर आणले आहेत.  करून तुम्ही अल्पावधीत चांगले पैसे कमवू शकता.  या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही शॉर्ट टर्म तसेच लॉंग टर्मसाठी चांगला परतावा मिळवू शकता.

विकास सेठी यांचा सल्ला
मार्केट एक्सपर्ट आणि सेठी फिनमार्टचे एमडी विकास सेठी यांनी झी बिझनेसचे संपादक अनिल सिंघवी यांच्याशी खास बातचीत करताना  2 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला. विकास सेठी यांनी Subros आणि Tarsons या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Tarsons 
ही कंपनी फार्मा, डायग्नोस्टिक आणि हॉस्पिटल सारख्या क्षेत्रांसाठी काम करते. 

Tarsons Products - Buy
CMP - 654.60
Target - 675
Stop Loss - 630

मार्केट एक्सपर्ट सेठी यांनी सांगितले की, कंपनीचे देशात 141 वितरक आहेत. या शेअरच्या गुंतवणूकीतून मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.

Subros वर गुंतवणूकीचा सल्ला

ही कंपनी देशातील सर्वात मोठी कार एसी बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचा बाजारातील हिस्सा सुमारे 42 टक्के आहे. आगामी काळात वाहन  क्षेत्रात जोरदार तेजी येऊ शकते. कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा 37 टक्के आहे.

Subros - Buy
CMP - 380
Target - 395
Stop Loss - 365