Share Market Update : शेअर बाजारातील Big Bull Rakesh Jhunjhunwala प्रमाणे तुम्हालाही Share Market मध्ये जबरदस्त कमाई करायची असेल तर, त्यासाठी तुम्हाला काही खास टीप्स वापराव्या लागतील. बाजारातून मोठ्या प्रमाणात परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तसाच एक शेअर आता बाजारात मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहे.
राकेश झुनझूनवाला यांचा Nazara Technologies Ltd's या IT कंपनीचा आयपीओ ( Initial Public Offer : IPO) बाजारात येणार आहे. 17 मार्च रोजी हा आयपीओ तुम्हा खरेदी करू शकता. या आयपीओची किंमत 1100 ते 1101 रुपये इतका असण्याची शक्यता आहे.
या आयपीओमध्ये आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities),आयआयएफएल सिक्युरिटीज (IIFL Securites), जेफरीज इंडिया आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज लीड मॅनेजर आहेत.
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे ऑनलाईन गेमिंग ऍपच्या वापरकर्त्यांची संख्या प्रचंड वाढली. यापुढेही ती वाढत जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
राकेश झुनझूनवाला यांची Titan Company मध्येही मोठी भागिदारी आहे. Titan कंपनीत 5.32 टक्के म्हणजेच 6850 कोटींची भागिदारी आहे. तज्ज्ञांच्या मते टायटनच्या शेअरची किंमत येत्या काही दिवसात 1650 रुपयांपर्यंत पोहचू शकते. सध्या या शेअरची किंमत 1400 रुपयांच्या जवळापास आहे. कारण सध्या सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते. टायटन देशातील अग्रणी ज्वेलरी ब्रांड आहे.