Best Stock | कमी वेळात कमवा पैसाच पैसा; हे 2 शेअर देऊ शकतील जबरदस्त परतावा

तुम्ही मार्केट एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करू शकता

Updated: Oct 22, 2021, 10:12 AM IST
Best Stock | कमी वेळात कमवा पैसाच पैसा; हे 2 शेअर देऊ शकतील जबरदस्त परतावा

मुंबई : शेअर बाजार अशी जागा आहे की, तुमची गुंतवणूक दुप्पट तिप्पट करण्याची क्षमता ठेवते. तर गुंतवणूकीत जोखिमदेखील असते. शेअर मार्केटमध्ये पैसा लावण्याचा विचार करीत असाल तर, मार्केट एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करू शकता. मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी आज 2 जबरदस्त शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Rupa and Company 
विकास सेठी यांनी रुपा ऍंड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही होजरी आणि गार्मेंट बनवणारी कंपनी आहे. रुपा फ्रंटलाइन, मॅक्रोमॅन, युरो हे या कंपनीचे लोकप्रिय ब्रॅंड आहे तर, रणवीर सिंह ब्रॅंड ऍंम्बेसेडर आहे. कंपनीचे फंडामेंटल्सदेखील मजबूत आहेत.

Rupa and Company- Buy call
CMP - 472.75
Target - 485
Stop Loss - 450

Gabriel India  
ग्रेब्रियल इंडिया ऑटो कंपनी आहे. सरकारी प्रोत्साहनामुळे कंपनीचा इलेक्ट्रिक वाहनांवर फोकस आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नसून जून तिमाहीमध्ये 12 कोटींचा Profit After Tax होता. एचडीएफसी म्युच्युअल फंडदेखील या शेअरबाबत बुलिश आहे. एचडीएफसीची Gabriel India  मध्ये 7.04 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. 

Gabriel India- Buy call

CMP - 151.90
Target - 165
Stop Loss - 145