Stock in News | बातम्यांच्या आधारावर आज चर्चेत असणारे स्टॉक; ट्रेडिंगपूर्वी वाचा यादी

 शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य शेअरची निवड करणे गरजेचे असते. शेअर निवडण्यासाठी त्यासाठीचे महत्वाच्या टिगर्सचा अभ्यास असावा लागतो. अनेकवेळा गुंतवणूक सल्लागार आपल्याला योग्य शेअरची निवड करून देतात.

Updated: Jan 17, 2022, 09:18 AM IST
Stock in News |  बातम्यांच्या आधारावर आज चर्चेत असणारे स्टॉक; ट्रेडिंगपूर्वी वाचा यादी title=

मुंबई :  शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य शेअरची निवड करणे गरजेचे असते. शेअर निवडण्यासाठी त्यासाठीचे महत्वाच्या टिगर्सचा अभ्यास असावा लागतो. अनेकवेळा गुंतवणूक सल्लागार आपल्याला योग्य शेअरची निवड करून देतात.

तर आपणही बातम्यांच्या आधारावर कोणते शेअर दिवसभरात ऍक्शनमध्ये असू शकतील याचा अंदाज लावू शकतो. त्यामुळे योग्य शेअरची निवड करून ट्रेडिंग केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळवता येतो. 
त्यामुळे बातम्यांच्या आधारावार आज दिवसभरात कोणत्या कंपन्यांचे शेअर ऍक्शनमध्ये असू शकतात. हे पाहूया

आजच्या मार्केटमधील महत्वाचे ट्रिगर्स

Ultra Tech Cement चे आज तिमाही निकाल जारी होणार आहेत. .त्यामुळे सिमेंट सेक्टरवर गुंतवणूकदारांची नजर असेल

Nazara Tech चा शेअर आज चर्चेत आहे. कारण प्रेफरेंशियल शेअर जारी करण्याबाबत आज बोर्डाची बैठक आहे.

Som Distilleries चा आजपासून राइट्स इश्यू ओपन होणार आहे. इश्यूची साइज 17.5 कोटी रुपये आहे.

Hinduja Global चा शेअरवर आज 150 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांशाची एक्स डेट आहे.

Info Edge च्या शेअरवर आज 8 रुपये अंतरिम लाभांशाची ए्क्स डेट आहे.

HDFC Bank चे तिमाही निकाल आले आहेत. बँकेच्या व्याज उत्पन्नात 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच नफ्यात 18 टक्क्यांची वाढ झाली आहे.

HCL टेकचे तिमाही निकाल आले आहेत. एचसीएलच्या उत्पन्नात वाढ झाली असून, नफा 5 टक्क्यांनी वाढला आहे.

Tin Plate ने आपले तिमाही निकाल प्रसिद्ध केले आहेत. त्यात कंपनीला चांगला नफा दिसून येत आहे.

M&M, Amara Raja  सारखे शेअर चर्चेत असतील. ACC बॅटरी स्टोरेजसाठी PLI स्किमसाठी बोली लागल्या आहेत.

Tata Motors, M&M सारखे शेअर्स चर्चेत राहतील. EV चार्जिंग आणि इंफ्रासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.

Hero Motocorp ला Ather Energy मध्ये 420 कोटीपर्यंत गुंतवणूकीची मंजूरी मिळाली आहे.

Maruti Suzuki ने पुन्हा एकदा आपल्या कारच्या किमतींमध्ये वाढ केली आहे.