OLX वर नवजात मुलं विकण्यामागचं व्हायरल सत्य

काय आहे हे प्रकरण? 

Updated: Oct 5, 2019, 01:01 PM IST
OLX वर नवजात मुलं विकण्यामागचं व्हायरल सत्य

मुंबई : OLX या वेबसाईटवर नवजात मुलं विकण्याच्या प्रकरणात एक मोठा खुलासा आला आहे. अजित राज नावाच्या व्यक्तीचं नाव आणि नंबर या पोस्टखाली देण्यात आला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याचं वय 18 वर्षे असून तो अविवाहित आहे. ज्याचं कोणतंही मुलं नाही. त्यामुळे असं असताना तो कोणत्या मुलाला कसं विकेल? 3 ऑक्टोबरच्या सकाळपासून येणाऱ्या फोनमुळे तो हैराण झाल्याचं देखील सांगितलं. संध्याकाळी त्याला प्रकरणाला उलगडा झाला आहे. 

त्याने दिलेल्या माहितीनुसार, ती व्यक्ती छायानगरचा राहणारा असून तो पाणीपुरी विकतो. त्याने अरका जैन नावाच्या युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा केला आहे. त्याचा मोठा भाऊ असून तो टीव्ही मॅकेनिक आहे. तर लहान बहिण असून ती शिक्षण घेत आहे. तसेच त्याची आई गीता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मोठ्या सूनेने 15 दिवसांअगोदरच मर्सी रूग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. 

या प्रकरणाबाबत गुरूवारपासून सतत फोन येत आहेत. लहान मुलाबाबत विचारलं जात आहे. पण असं कोण का करत आहे? हाच प्रश्न आम्हाला पडत आहे. शुक्रवारी जवळपास याबाबत 18 फोन आले. पण कुणीही हा नंबर कोणत्या साईटवर दिला आहे याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. 

संध्याकाळी याबाबत मीडियातून माहिती मिळाली की, OLX या वेबसाइटवर हा नंबर देण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे या मुलाने OLX चा कधीच वापर केला नाही. एंड्रॉयड फोनचा वापर करतो पण OLX चा वापर केलेला नाही. कुणीतरी हे माझ्या मुलाचं नाव खराब करण्यासाठी करत असल्याचं त्याने सांगितलं. आपल्याला आणि आपल्या मुलाला त्रास देण्याच्या दृष्टीकोनातून हे सगळं केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. हा खोडकरपणा असला तरीही यामुळे कुणाच्यातरी भावना दुखावल्या जातील याचा तरी विचार करायला हवा होता, असं त्यांच म्हणणं आहे.