आता जुन्या गाड्या तुम्हाला करणार कंगाल....

जुनी गाडी सांभाळण्यापेक्षा नवीन गाडी घेणं होणार अधिक सुखकर 

Updated: Oct 5, 2019, 10:20 AM IST
आता जुन्या गाड्या तुम्हाला करणार कंगाल....  title=

मुंबई : जर तुम्ही 15 वर्षे जुनी गाडी वापरत असाल तर तुम्ही लवकरच कंगाल होण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला माहितच आहे, जुन्या गाड्यांच्या देखभालीकरता त्यांच्या मेंटेनन्सकरता सर्वाधिक खर्च होतो. असं असताना रजिस्ट्रेशनमध्ये देखील वाढ झाली आहे. 

15 वर्षे जुन्या असलेल्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नव्हे वाढ झालेल्या दरात ती व्यक्ती नवीन गाडी खरेदी करू शकते एवढी ही किंमत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वॉल्यन्ट्री स्क्रॅपिंग ऑफर स्विकारली. तर वाहनाचं दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशनकरता 25 टक्के वाढ झाली आहे. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्रालयने दिलेल्या प्रस्तावानुसार, दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करण्याकरता 25 टक्के वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर कर्मशिअल वाहनांच वार्षिक फिटनेसच्या दरात देखील 125 टक्के वाढ झाली आहे. सरकार या नियमाला 2020 सालापासून सुरू करणार आहे. सरकारने स्क्रॅपिंगकरता अप्रूव्ह सेंटर्स वाढवण्याकडे लक्ष ठेवले आहे. नवीन प्रस्ताव लागू झाल्यास 15 वर्षे जुन्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये वाढ होऊ शकतो. 

गाड्यांच्या फिटनेस सर्टिफिकेटवर कंपनी कोणतीही वाढ करणार नाही. या व्यतिरिक्त दोन चाकी आणि तीन चाकी वाहनांवर रिन्युअल फी 2 हजार ते 3 हजारापर्यंत होऊ शकते.तर चार चाकी गाड्यांची फी 600 रुपयांवरून 15 हजारापर्यंत होऊ शकते.  तसेच या प्रस्तावानुसार 15 वर्षे जुन्या असणाऱ्या ट्रक किंवा बसच्या फिटनेस टेस्ट फी 200 रुपयांनी वाढून 25 हजारांपर्यंत केली आहे. तर कॅब आणि मिनीट्रक करता फी ही 15 के 20 हजार रुपये होऊ शकते. तेसच फिटनेस टेस्ट करणं प्रत्येक गाडीसाठी अनिवार्य आहे.