Rs 840 Crore Biryani Business: भारतामध्ये 1990 च्या दशकापासून मेकडॉनल्डस, बर्गर किंगसारखे ब्रण्ड भारतीयांना आकर्षित करत असल्याचं दिसून येत आहे. 2015 पासून बर्गर, पिझ्झा यासारख्या पाश्चिमात्य गोष्टी भारतात प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. मात्र आयआयटीमधून पदवी मिळवलेल्या विशाल जिंदाल नावाच्या तरुणाने भारतीय संस्कृतीमधील खाद्य पदार्थांमधून कंपनी सुरु करण्याचा विचार केला. 2015 साली वयाच्या 40 व्या वर्षी जिंदाल यांनी 'बिर्याणी बाय किलो' नावाच्या ब्रॅण्डची सुरुवात केली. भारतभरातील अनेक शहरांमध्ये या ब्रॅण्डच्या नावाखाली दुकानं सुरु करण्यात आली. ग्राहकांना ताजी आणि खास पद्धतीने तयार केलेली बिर्याणी पुरवण्याचा यामागे मुख्य उद्देश होता.
खाद्य उद्योगामध्ये उतरण्यापूर्वी जिंदार यांनी हेज फंड्स आणि प्रायव्हेट इक्विटीच्या क्षेत्रात चांगलं यश मिळवलं होतं. मात्र खाद्य उद्योग क्षेत्रात आधीपासून कोणतीही गुंतवणूक आणि अनुभव नसताना त्यांनी त्याच्या कन्फर्ट झोन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिर्याणीचा जागतिक दर्जाचा ब्रॅण्ड निर्माण करण्याचा विशाल जिंदाल यांचा मानस होता. भारतीय संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या पदार्थाला लोकप्रियता मिळवून देण्याचं विशाल जिंदाल यांच्या मनात फार पूर्वीपासून होतं. विशाल जिंदाल नेहमी उद्योगामध्ये धोका पत्करला पाहिजे असं सांगायचे आणि तेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. वयाच्या 40 व्या वर्षी हा असा धोका पत्कारणं मला फार योग्य वाटलं. वयाच्या पन्नाशीपर्यंत वाट पाहून नंतर उद्योगात उतरणं योग्य नसल्याचं वाटल्याने आपण तातडीने निर्णय घेतल्याचं विशाल जिंदाल यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं.
दोन मुख्य गोष्टींचा विचार करुन विशाल जिंदाल यांनी 'बिर्याणी बाय किलो'ची स्थापना केली. पहिली गोष्ट म्हणजे दर्जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा! प्रत्येक ऑर्डरप्रमाणे बिर्याणी नव्याने तयार केली जाते. ग्राहकांना दिलं जाणारं अन्नपदार्थ ताजे असतील याकडे विशेष लक्ष दिलं गेलं. यासाठी डिलेव्हरी करण्यासाठी अधिक वेळ लागला तरी हरकत नाही मात्र पदार्थाच्या चवीशी तडजोड नको असं 'बिर्याणी बाय किलो' मागील धोरण होतं. मात्र दर्जा संभाळण्याच्या नादात ऑर्डससाठी अधिक वेळ लागत असल्याने वेगाने पदार्थ डिलेव्हर करणाऱ्या आऊटलेटबरोबर स्पर्धा करता येणार नाही असं सुरुवातीला वाटलं.
नक्की वाचा >> 9000 कोटी दान, 150 कोटींचं घर, कोरोनात 2500 कोटी मदत अन्...; रतन टाटांचा पगार किती होता?
एकीकडे ग्राहकांना वेगाने ऑर्डर मिळत असताना दुसरीकडे 'बिर्याणी बाय किलो' ऑर्डर मिळाल्यानंतर एका तासाने बिर्याणी फ्रेश बनवून डिलेव्हर करायचे. मात्र हे फार आव्हानात्मक असल्याचं विशाल जिंदाल यांचं म्हणणं आहे. पण नंतर हाच कंपनीचा युएसपी बनला. फूड डिलेव्हरी अधिक वेगवान झाल्याने 'बिर्याणी बाय किलो'समोरील आव्हान अधिक खडतर झालं. एकंदरित खाद्य उद्योगाचा विचार केल्यास ऑनलाइन माध्यमातून जेवण मागवण्याचा ट्रेण्ड 1.7 ते 1.8 टक्क्यांनी वाढत असल्याचं निरिक्षण विशाल जिंदाल यांनी नोंदवलं. हाच ट्रेण्ड भविष्यामध्येही कायम राहील असा अंदाजही त्याने व्यक्त केला.
आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलल्यानंतर तरुणांना विशाल जिंदाल काय सल्ला देणार असं विचारला असता, "उद्योगातील आव्हानांची कल्पना असल्यास तो सुरु करणं अधिक कठीण जातं. मात्र मी हा मार्ग निवडला आणि त्यामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आज आपण फार समाधानी आहोत," असं सांगितलं. आज