Super Pink Moon: २०२० मधील सर्वात मोठा आणि प्रखरपणे चमकणाऱ्या चंद्राचं दर्शन

आज २०२० या वर्षातील सर्वात मोठा, सर्वात प्रखर असा चंद्र दिसत आहे. 

Updated: Apr 7, 2020, 10:45 PM IST
Super Pink Moon: २०२० मधील सर्वात मोठा आणि प्रखरपणे चमकणाऱ्या चंद्राचं दर्शन title=

मुंबई : आज २०२० या वर्षातील सर्वात मोठा, सर्वात प्रखर असा चंद्र दिसत आहे. आज पोर्णिमा असल्याने सुपर मून पाहायला मिळतो आहे. चंद्राचा आकार आज सर्वात मोठा दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे प्रदुषण कमी असल्याने आकाश देखील मोकळे आहे. त्यामुळे सुपर पिंक मूनचं सूदर दृष्य पाहायला मिळत आहे. 

पोर्णिमेला चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी होतं. ज्यामुळे चंद्र आणखी मोठा दिसतो. सुपर पिंक मूनमध्ये चंद्र नेहमी पेक्षा १४ टक्के मोठा आणि 30 टक्के अधिक प्रखर दिसतो. सुपर पिंक मून पाहताना डोळ्यांना कोणताही त्रास होत नाही.

या वर्षी तीन सुपर मून दिसणार आहे. याआधी ९ मार्चला देखील सूपर मून दिसला होता. एप्रिलमध्ये पिंक सुपर मून तर मे मध्ये तिसरा सूपर मून दिसणार आहे.