कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या मुलांची संख्या मोठी आहे.'

Updated: May 28, 2021, 05:08 PM IST
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले महत्त्वाचे निर्देश title=

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी सुनावणी झाली. अनाथ झालेल्या मुलांना त्वरित दिलासा द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना दिले आहेत. सुनावणीदरम्यान म्हटले की, कोरोना साथीने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या मुलांची संख्या मोठी आहे.'

न्यायमूर्ती एल.एन.राव आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने सर्व जिल्हा दंडाधिका-यांना मार्च 2020 पासून शनिवारी संध्याकाळपर्यंत अनाथ मुलांची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. तसेच त्या मुलांची माहिती एनसीपीसीआरच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश न्यायमूर्ती गौरव अग्रवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आला आहे.

अनाथ मुलांची ओळख करुन त्यांना तातडीने दिलासा द्यावा असे निर्देश राज्य सरकारांना दिले आहे. विशेष म्हणजे 24 तासांत 1,86,364 नवीन रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण संक्रमितांची संख्या 2,75,55,457 झाली आहे. 44 दिवसानंतर देशात कोरोना संसर्गाची कमी प्रकरणे आढळले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 3,660 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर मृत्यूची संख्या 3,18,895 वर गेली आहे. सध्या देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्याही 23,43,152 आहे, जी एकूण प्रकरणांच्या 8.50 टक्के आहे. आत्तापर्यंत, देशातील एकूण 2,48,93,410 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.