Tata ची BigBasket भागीदारी, Jio Mart, Amazon ला देणार टक्कर

Tata Sons ने ऑनलाइन ग्रोसरी सेलर बिग बास्केट (BigBasket) मध्ये हिस्सा मिळवला आहे. ज्यामुळे आता टाटा Amazon.com, Walmart, Flipkart आणि Jio Mart ला सरळ टक्कर देणार आहे. Tata Sons ची Tata Digital Limited ने BigBasket चा मोठा भाग खरेदी केला आहे. Tata ने शुक्रवारी याबाबत अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. BigBasket ने देखील यावर काहीही स्पष्ट उत्तर दिलं नाही.

Updated: May 28, 2021, 04:28 PM IST
Tata ची BigBasket भागीदारी, Jio Mart, Amazon ला देणार टक्कर title=

मुंबई : Tata Sons ने ऑनलाइन ग्रोसरी सेलर बिग बास्केट (BigBasket) मध्ये हिस्सा मिळवला आहे. ज्यामुळे आता टाटा Amazon.com, Walmart, Flipkart आणि Jio Mart ला सरळ टक्कर देणार आहे. Tata Sons ची Tata Digital Limited ने BigBasket चा मोठा भाग खरेदी केला आहे. Tata ने शुक्रवारी याबाबत अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. BigBasket ने देखील यावर काहीही स्पष्ट उत्तर दिलं नाही.

भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने मार्चमध्ये Tata Digital ला BigBasket मध्ये 64.3 टक्के भागादारीसाठी मंजुरी दिली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ही डील 95 अरब रुपयांची आहे. यामुळे चीनमधील उद्योगपती जॅक माची AliBaba आणि इतर गुंतवणूकदारांचा BigBasket मधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा आहे.

कोरोनामुळे सध्या भारतात ऑनलाईन किराणा मोठ्या प्रमाणात मागवला जात आहे. त्यामुळे कंपन्यांना देखील फायदा होत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार Tata Sons एक 'Super App' विकसित करण्याच्या तयारीत आहे. या APP मुळे कंपनी संपूर्ण कंज्यूमर बिझनेस एकत्र आणेल. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे Tata Sons मीठ ते लग्जरी कार आणि सॉफ्टवेयर इंडस्ट्रीमध्ये देखील सक्रीय आहे.

Tata Group गेल्या अनेक दिवसांपासून BigBasket मध्ये भागीदारसाठी प्रयत्न करत होता. Tata Digital Limited एक दिग्गज कंपनी आहे. जी Tata Sons Pvt Ltd च्या अधिकाराखाली काम करते.

ऑनलाइन ग्रॉसरी मार्केट BigBasket ची स्थापना 2011 मध्ये झाली. ही कंपनी भारतातील 25 शहरांमध्ये काम करतेय. याची स्पर्धा Amazon India, Grofers आणि Flipkart सोबत आहे.