सर्वोच्च न्यायालयाचा आसाराम बापूला दणका

पुढील निर्णायक सुनावणी काय असणाऱ ?

Updated: Jul 15, 2019, 01:53 PM IST
सर्वोच्च न्यायालयाचा आसाराम बापूला दणका title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सूरत बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला जामीन देण्याची याचिका पुन्हा एकदा फेटाळण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून हा निर्णय देण्य़ात आला आहे. सोबतच लवकरात लवकर या प्रकरणी सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देशही कनिष्ठ न्यायालयाला देण्यात आले आहेत. 

आसाराम बापूविरोधात सुरु असणाऱ्या खटल्य़ामध्ये अद्यापही १० साक्षीदारांची साक्ष घेतली नसल्याचं गुजरात सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणी पुढील निर्णायक सुनावणी काय असणाऱ याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 

आसाराम बापू गेल्या चार वर्षांहून अधिक काळ जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. ज्यानंतर संबंधित प्रकरणी दोषी ठरवत आसाराम बापूला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूर येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारक केल्याप्रकरणी आसाराम बापूला दोषी ठरवण्यात आलं होतं. मध्यप्रदेश येथील छिंदवाडा येथे असणाऱ्या आसारामच्या आश्रमात ती शिक्षण घेत होती. पीडीतेच्या आरोपांनुसार जोधपूरनजीक असणाऱ्या मनई आश्रमात बोलवून आसारामने तिच्यावर अत्याचार केले होते. पण, आपल्यावर करण्यात आलेल्या या आरोपांना आसारामने मात्र फेटाळून लावलं होतं. 

भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३७६ अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं होतं. राजस्थानमध्ये सुरू असणाऱ्या या प्रकरणाशिवाय त्याच्य़ावर आणखी एक खटला हा गुजरातमध्येही सुरु आहे.