तीन तलाकवर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या वादग्रस्त तीन तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.

Updated: Aug 22, 2017, 04:35 PM IST
तीन तलाकवर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या वादग्रस्त तीन तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ५ न्यायाधीश तीन तलाकवरचा निर्णय घेतील.

तीन तलाकच्या मुद्द्यावर ११ मे ते १८ मेपर्यंत सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. तीन तलाकला आम्ही वैध मानत नाही, असं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलं होतं.

निकाहच्या वेळी निकाहनामामध्ये महिलेला तीन तलाकला नाही म्हणण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं १८ मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला विचारला होता. तसंच निकाहनामामध्ये तीन तलाकवर महिलांची मर्जीही काझींनी विचारात घेण्याचे निर्देश ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला देता येतील का, असंही न्यायालयानं विचारलं होतं.