मुंबई : जर तुम्ही ऑनलाईन जेवण मागवत असाल तर ही बातमी नक्की वाचा. येत्या काही दिवसांत ऑनलाईन पदार्थांची किंमत वाढणार आहे. जीएसटी काउंसीलच्या होणाऱ्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. कमिटीच्या फिटमेंट पॅनलने फूड डिलिव्हरी ऍप्स किमान 5 टक्के जीसॅटच्या दरात आणण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे काही दिवसांनंतर ऑनलाईन पदार्थ मागविण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
जीएसटी काउंसील समितीची बैठक शुक्रवारी होणार आहे. बैठकीच्या अजेंडामध्ये या विषयावर चर्चा केली जाईल. जीएसटी काउंसीलची बैठक शुक्रवारी लखनऊमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत अनेक मुख्य विषयांवर चर्चा केली जाईल. सध्याच्या परिस्थितीत सरकारला करात 2 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
जीएसटी काउंसीलची बैठक 17 सप्टेंबर रोजी लखनऊमध्ये होणार आहे. त्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच इतर राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश आहे. जीएसटी परिषदेची शेवटची बैठक 12 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. आता होणाऱ्या बैठकीमध्ये पेट्रोल आणि डिझेलसह सर्व मोठ्या विषयांवर चर्चा होईल.
या विषयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बैठक पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार होवू शकतो. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमतीला आळा घालता येईल. 17 सप्टेंबर रोजी लखनऊमध्ये होणारी बैठक सर्वसामान्य जनतेसाठी देखील महत्त्वाची ठरणार आहे.