मुंबई : सोशल मीडियावर आपल्याल्या वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजन व्हिडीओ पाहायला मिळताता. आनंद महिंद्रा देखील आपल्या अकाउंटवरुन वेगवेगळे प्रकारचे मनोरंजक व्हिडीओ शेअर करत असतात. तुम्ही जर त्यांचे अकाउंट तपासले, तर तुम्हाला ते अनेक मनोरंजक पोस्ट ने भरलेले दिसेल.
आनंद महिंद्रा आपल्या फॉलोअर्ससाठीच काही प्रेरणादायी किंवा मनोरंजक व्हिडीओ शेअर करत असतात. अलिकडच्या दिवसांत, त्यांनी जुना काळातील आठवणींशी मिळता जुळता एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. जे पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुले टेलिव्हिजन स्क्रीनवर मॅच पाहत आहेत, तेव्हा एक बॉलरने बॉल टाकताच बॅट्समॅन असा काही त्या बॉलला मारतो की, तो बॉल सरळ टीव्हीतून बाहेर येतो. त्यानंतर त्या टीव्हीतील एक मुलगा टीव्ही स्क्रीनच्या एकदम जवळ येतो आणि आपला बॉल परत मागतो. हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, ही लाईव्ह मॅच तर आहे परंतु ती टीव्हीवरील मॅच नाही तर ही खरीखुरी मॅच खेळली जात आहे.
हा मजेदार व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्राने कॅप्शन लिहिले, "हा एक जुना व्हिडीओ आहे, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला आठवते की सध्याच्या या कोरोना महामारीने सर्वकाही बदलले आहे. मला पुन्हा खऱ्या गोष्टी अनुभवायच्या आहेत."
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी देखील त्यावर मजेदार कमेंट्स केल्या. हा व्हिडीओ खरोखरचं इतका मस्त आणि मजेदार आहे की, तुम्ही देखील या मुलांचे आणि त्यांच्या कल्पनेचे कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकणार नाही.
An old video. But it reminded me today of how the pandemic has forced us to put a ‘Screen’ in front of every activity. I want to crawl through that screen and experience the “real” thing again… pic.twitter.com/FjvxUsv7Gm
— anand mahindra (@anandmahindra) September 12, 2021
मुलांची ही सर्जनशीलता सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. यावर अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या. एका यूजरने टिप्पणी करताना लिहिले, 'गरज ही शोधाची जननी आहे.' तर दुसऱ्या युजरने कमेंट केली की, 'मला वाटते की बाहेर बसलेला प्रत्येकजण रेफरी आहे.' याशिवाय, इतर अनेक यूजर्सनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स दिल्या आहेत.