Tata Consumer Products To Buy Haldiram: टाटा समूहाची (TaTa Group) एफएमसीजी कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TATA Consumer Products) लवकरच मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लवकरच नागपुरचा प्रसिद्ध मिठाई ब्रँडमध्ये वाटेकरी होऊ शकते. त्यासंबंधी दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी सुरू आहे. जर, ही बोलणी यशस्वी झाली तर टाटा नागपुरची (Nagpur) कंपनी हल्दीराममध्ये (Haldiram) स्टेक खरेदी करु शकते.
समोर आलेल्या माहितीनुसार, टाटा कंझ्युमर हल्दीराममध्ये 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करू शकते. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हल्दीरामने हा स्टेक विकण्यासाठी 10 बिलियन डॉलर्सचे मुल्यांकन मागितले आहे. मात्र, टाटाच्या मते हल्दीरामने मागितलेली रक्कम ही अपेक्षापेक्षा जास्त आहे. टाटाकडून जर ही डील यशस्वी झाली तर, पेप्सी, बीकानेर आणि रिलायन्स रिटेलसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यास मदत मिळेल. मात्र, या दोन्ही कंपन्यांमध्ये नेमकं बोलणं सुरू आहे हे अद्याप कळू शकलेले नाहीये.
टाटा कंझ्युमर प्रोडक्सचे प्रवक्ता व हल्दीरामचे सीईओ कृष्ण कुमार चुटानी यांनी या कराराबातच्या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये. मात्र, चर्चांच्या टाटाच्या शेअर्सवर जबरदस्त परिणाम झालेला आहे. टाटा कंझ्युमरचा शेअर 2.37 टक्क्यांनी वधारला असून शेअर 866 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.
दरम्यान, नमकीन भुजिया ते मिठाईपर्यंत हल्दीरामच्या वस्तू घराघरांत पोहोचल्या आहेत. हल्दीरामचे देशभरात 150 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत. यात मिठाईसह अनेक प्रकारच्या थाळीदेखील उपलब्ध आहेत. देशातील फरसण व व स्नॅक्सच्या बाजारपेठेतील 13 टक्के मार्केट हल्दीरामने काबीज केले आहे. हल्दीराम सिंगापूर आणि अमेरिकासारख्या देशातही उपलब्ध आहे. हल्दीराम ब्रँड हा कौटुंबिक व्यवसाय आहे. नागपूरस्थित हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल हा मोठा भाऊ शिव किशन अग्रवाल चालवतात, तर दिल्लीस्थित हल्दीराम स्नॅक्स हे धाकटे भाऊ मनोहर आणि मधुसूदन अग्रवाल चालवतात.
Tata Consumer Product ने जर हल्दीरामनेसोबत यशस्वीरित्या डील केली तर टाटा ग्रुपची टक्कर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलसोबत व आयटीसी सारख्या मोठ्या कंपन्यांसोबत होणार आहे. बुधवारी जारी झालेल्या रिपोर्टनुसार, बेन कॅपिटलसह अन्य खासगी इक्विटी फर्मसोबत 10 टक्के भागीदारीसाठी बोलणी करत आहे.