Tata Motors Share Price: सध्या बाजारात अनेक स्टॉक्स (stocks) खरेदीसाठी खुले झाले आहेत. त्यात तुमच्याही निरीक्षणास येईल ती एक गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्राशी (banking sector) संबंधित अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी खुले आहेत. तेव्हा आपण अशा पद्धतीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता. आयटी कंपन्यांमध्ये आता तेवढी तेजी पाहायला मिळत नसून त्यापेक्षा आता बॅंकिंग क्षेत्रात चांगले स्टॉक्स येऊ लागले आहेत. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात चांगली प्रगती पाहायला मिळते आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आता ऑटोमाबाईल क्षेत्रातही गुंतवणूक करू लागले आहेत. तुम्ही टाटा समूहाची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या शेअर्समध्येही पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला शेअरमधून (investment in share) चांगला फायदा मिळू शकतो. त्यासाठी फक्त तुम्हाला या काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. (Tata Group Share Global Brokerage Morgan Stanley Bullish on Tata Motors Stock check next target and return Share Market in Marathi)
टाटा मोटर्सच्या शेअरनं 52 आठवड्यांच्या नीच्चांकीवरून सुमारे 15 टक्क्यांचे रिटर्न्स परत मिळवले आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने (morgan stanley) टाटा मोटर्सच्या शेअर्सवर आपलं ओव्हरव्हेट रेटिंग कायम ठेवलं आहे. जेव्हा एखाद्या शेअरनं आपलं ओव्हरव्हेट रेटिंग कायम ठेवलं असेल तर याचा अर्थ असा की ब्रोकरेज स्टॉकवर हा स्टॉक तेजीत आहे आणि स्टॉक त्याच्या पीअर बेंचमार्कला मागे टाकण्याची शक्यतादेखील आहे. बेन्चमार्क (benchmark) हे एक प्रकारे मोजमाप करण्याचं प्रमाण आहे ज्यावर आपण एखाद्या स्टॉकचा परफॉर्मन्स मोजू शकतो. तर ओव्हरवेटिंग रेट म्हणजे एक असा स्टॉक जो बाजारात आपल्या बेन्चमार्कपेक्षा जास्त वेटिंग म्हणजे त्याची प्राईस पर शेअर असण्यास पात्र आहे. त्यामुळे सध्या टाटा मोटर्सचा शेअर हा ओव्हरवेटिंग रेटच्या वर आहे.
2020 च्या पातळीपासून टाटा मोटर्सचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. 3 जानेवारी 2020 रोजी हा दर 191.10 रुपये होता. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळाला आहे. 12 मे 2022 रोजी स्टॉकने BSE वर 52 आठवड्यांचा नीच्चांक (रूपये 366.05) बनवला. तर 18 जानेवारी 2022 रोजी स्टॉकमधील 2 आठवड्यांचा उच्चांक (रूपये 528.35) इतका होता.
जागतिक ब्रोकरेज मॉर्गन स्टॅनलीने टाटा मोटर्सच्या स्टॉकचे ओव्हरवेट (overweight) रेटिंग कायम ठेवले आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत 502 रुपये ठेवण्यात आली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी या शेअरची किंमत 419 रुपयांवर बंद झाली होती. तेव्हा अशा रीतीनं स्टॉकमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 20 टक्के वाढ होऊ शकते. 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉकचा परतावा 16 टक्क्यांच्या आसपास नकारात्मक राहिला आहे.
जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत टाटा मोटर्सचा तोटा कमी झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत टाटा मोटर्सचा एकत्रित तोटा (loss) गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत रूपये 4,441.6 कोटींवरून कमी होऊन रूपये 945 कोटी झाला आहे. याचेवळी जून तिमाहीत कंपनीला 5,006 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत (Q2FY23) या टाटा मोटर्सचा एकत्रित महसूल 29.7 टक्क्यांनी वाढून रु. 79,611.3 कोटी झाला आहे. जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रूपये 61,379 कोटी होता. सप्टेंबर तिमाहीत त्याच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 15% वाढ झाली आहे. भारतीय बाजारात देशांतर्गत घाऊक विक्री वार्षिक 19 टक्क्यांनी वाढून 93,651 युनिट्स झाली.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)