TATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; 'या' 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार

Tata Steel Long Products amalgamation: कोणत्या मोठ्या बदलांना मिळाला हिरवा कंदील? उद्योग जगतामध्ये याच बदलांची चर्चा. पाहा मोठी बातमी.   

सायली पाटील | Updated: Oct 20, 2023, 09:12 AM IST
TATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; 'या' 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार  title=
Tata Group steel Long Products amalgamation business news

Tata Group : भारतीय उद्योग (Business News) जगतामध्ये मागील कैक वर्षांपासून मोलाचं योगदान देत देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये हातभार लावणाऱ्या उद्योगसमुहांमधील एक नाव म्हणजे टाटा समुह. फक्त उद्योगच नव्हे, तर समाजसेवा आणि तत्सम इतर क्षेत्रांमध्येही या समुहाकडून सिंहाचा वाटा घेतल्याचं कायमच पाहायला मिळालं. आता याच उद्योग समुहामध्ये काही महत्त्वाचे बदल होणार असून, त्या बदलांसाठी रितसर मान्यताही मिळाली आहे. त्यामुळं या बदलांचीच सध्या उद्योग जगतामध्ये मोठी चर्चा सुरु आहे. 

टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्स लिमिटेड (Tata Steel Long Products Ltd) च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार एनसीएलटी (NCLT) कडून टाटा स्टील लिमिटेडच्या विलिनिकरणास मान्यता मिळाली आहे. टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्ससोबतच इतर सहा कंपन्यांचंही विलिनीकरण होणार आहे. म्हणजेच एकूण सात कंपन्यांचं विलिनीकरण आता होणार आहे. 

टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्सकडून शेअर बाजारात देण्यात आलेल्या माहितीनुसार एनसीएलटीच्या कटक पीठनं 18 ऑक्टोबर रोजीच टाटा स्टीलसोबतच्या विलिनीकरणास मान्यता दिली असून याच वर्षभरात ही प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे. 

हेसुद्धा वाचा : 100 रुपयांत मुंबई गाठली अन् आज आहेत 11500 कोटींचे मालक; शाहरुखच्या शेजाऱ्यांचा थक्क करणारा प्रवास

 

टाटा स्टीलचे सीईओ आणि कार्यकारी संचालक टीवी नरेंग्रन यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार कंपन्यांची विलिनीकरण प्रक्रिया 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण होईल. या विलिनीकरण प्रक्रियेत टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्स, टाटा मेटालिक्स, टीआरएफ, द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया, इंडियन स्टील एंड वायर प्रोडक्ट्स, टाटा स्टील माइनिंग आणि एस एंड टी मायनिंगचा समावेश आहे. 

टाटा स्टीलचा आणखी एक मोठा निर्णय 

एकिकडे ही विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असचानाच दुसरीकडे टाटा स्टीलकडून टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी ल‍िम‍िटेडच्या टीपी वर्धमान सूर्या लिम‍िटेड (TPVSL) मध्ये 26 टक्क्यांची भागिदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. पण, अद्यापही कंपनीकडून या संपूर्ण व्यवहाराची अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. इथंच न थांबता टाटा स्टीलकडूनच जारी करण्यात आलेल्या एका पत्रकातून समोर आलेल्या माहितीनुसार टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जीकडून (TPREL) 379 मेगावॅट स्वच्छ उर्जाही खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या माध्यमातून कंपनी स्वच्छ आणि हरित उर्जेला प्रोत्साहन देणारे काही बदल करण्याचा मानस बाळगून आहे.