100 रुपयांत मुंबई गाठली अन् आज आहेत 11500 कोटींचे मालक; शाहरुखच्या शेजाऱ्यांचा थक्क करणारा प्रवास

रुणवाल ग्रुपचे सुभाष रुणवाल एकेकाळी मुंबईत ‘वन रूम-किचन’मध्ये राहत होते. पण, आज ते बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा शेजारी आहे. बिझनेस टायकून सुभाष रुणवाल यांची संपत्ती 11,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.  

आकाश नेटके | Updated: Oct 19, 2023, 05:09 PM IST
100 रुपयांत मुंबई गाठली अन् आज आहेत 11500 कोटींचे मालक; शाहरुखच्या शेजाऱ्यांचा थक्क करणारा प्रवास title=

Subhash Runwal Success Story: देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांचे शहर असलेल्या मुंबईत (Mumbai) अनेकजण त्यांची मोठी स्वप्ने घेऊन येत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली ती व्यक्ती आपलं स्वप्न मुंबईत पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतो. मुंबईत अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या हातात काहीच रक्कम घेऊन आली नाहीत अन् आता मुंबईवर अधिराज्य गाजवत आहेत. अशीच एका व्यक्ती आहे जी 100 रुपये घेऊन मुंबईत आली आणि आज ती कोट्यवधींची मालक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही व्यक्ती सुपरस्टार किंग खानची (Shahrukh Khan) शेजारी देखील आहे. किंग खानच्या या शेजाऱ्याचे नाव सुभाष रुणवाल (Subhash Runwal) आहे. मुंबईसारख्या शहरात सुभाष रुणवाल यांनी 100 रुपयांपासून कोटींपर्यंतचा प्रवास कसा केला आहे.

कोण आहेत सुभाष रुणवाल?

सुभाष रुणवाल 80 वर्षांचे असून ते रिअल इस्टेट उद्योजक आहेत. ते मुंबईचे सुप्रसिद्ध विकासक आहेत. याशिवाय ते रुणवाल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्याची कंपनी परवडणाऱ्या घरांपासून लक्झरी आणि मॉल्सपर्यंत सर्व काही बांधण्याचे काम करते. सर्वसामान्य वर्गापासून ते श्रीमंत वर्गापर्यंत सर्वांसाठी ते हे काम करतात.

वयाच्या 21व्या वर्षी गाठली मुंबई

सुभाष रुणवाल यांच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीला खूप संघर्ष केला. महाराष्ट्रातील धुळे या छोट्या शहरातून त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या लहानपणी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यानंतर त्यांनी पुण्यातून शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या 21 व्या वर्षी ते मुंबईत आले. सुभाष रुणवाल हे मुंबईत आला तेव्हा त्यांच्याकडे फक्त 100 रुपये होते.

वयाच्या 21 व्या वर्षी मुंबईत आल्यानंतर सुभाष रुणवाल यांनी अकाउंटंट होण्याचे स्वप्न उराशी बागळगलं होतं. शिक्षण आणि कर्तृत्वामुळे ते सीए झाले आणि नंतर ते अमेरिकेतील अर्न्स्ट अँड अर्न्स्ट कंपनीत सीए म्हणून काम करू लागले. पण नंतर त्यांचे तिथे मन लागलं नाही, म्हणून ते नोकरी सोडून भारतात परत आले.

अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी रिअल इस्टेट व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत कमावलेल्या पैशातून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. रिअल इस्टेट क्षेत्र सुरू करण्यासाठी त्यांनी ठाण्यात 22 एकर जमीन खरेदी केली. त्यानंतर त्यांनी रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला. यानंतर त्यांनी तिथे 10 हजार स्क्वेअर फूटमध्ये मोठी गृहनिर्माण संस्था बांधली. यानंतर सुभाष रुणवाल लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्यासाठी प्रसिद्ध झाले. 2002 मध्ये त्यांनी मुंबईतील मुलुंड परिसरात पहिला मॉल बांधला. सुरुवातीच्या काळात ते मुंबईत वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. नंतर त्यांनी शाहरुख खानच्या बंगल्याशी तुलना करता येणारा एक आलिशान बंगला खरेदी केला. सध्या ते सुमारे 11,500 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहेत.