भारतातल्या 'या' 10 सेलिब्रेटिंच्या नावावर होतो सर्वात जास्त Scam, यादी जाहीर... पहिलं नाव वाचून व्हाल हैराण

Celebrity Hacker Hot List 2024 : McAfee ने एक यादी जारी केली आहे. या भारतीय सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. या सेलिब्रेटिंच्या नावावर हॅकर्स लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात. लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी या सेलिब्रेटिंच्या नावाचा वापर केला जातो.

राजीव कासले | Updated: Oct 8, 2024, 04:43 PM IST
भारतातल्या 'या' 10 सेलिब्रेटिंच्या नावावर होतो सर्वात जास्त Scam, यादी जाहीर... पहिलं नाव वाचून व्हाल हैराण title=

Celebrity Hacker Hot List 2024 : McAfee ने एक यादी जारी केली आहे. यात भारतीय सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. या सेलिब्रेटिंच्या नावावर हॅकर्स लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात. ग्लोबल सायबर सिक्युरिटी कंपनी  McAfee ने  Celebrity Hacker Hot List 2024 यादी जाहीर केली आहे. लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी या सेलिब्रेटिंच्या नावाचा वापर केला जातो. या सेलिब्रेटिंच्या नावाचा वापर करत हॅकर्स लोकांचा डेटा चोरी करण्यापासून लोकांच्या खात्यातून पैसे लंपास करण्यापर्यंत फसवणूक करतात. 

सेलिब्रेटिंची यादी जाहीर
McAfee ने दहा सेलिब्रेटिंची नावं जाहीर केली आहेत. यात पहिल्या क्रमांकावर ओरीचं नाव आहे. गेल्या काही काळात ओरी म्हणजे ओरहान अवत्रमणि (Orhan Awatramani) हा प्रचंड लोकप्रिय झाला आहे. सेलिब्रेटिंचा मित्र म्हणून अनेक पार्ट्या आणि कार्यक्रमात ओरी हमखास दिसतो. अंबानी कुटुंबियांचाही ओरी जवळचा मानला जातो. अनंत अंबानीच्या लग्नात ओरी स्टेजवर दिसला होता. तरुणांमध्येही ओरीची क्रेझ आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगार उचलतात. लोकांना सेलिब्रेटिंच्या नावाने फोन करतात, लोकांना या सेलिब्रेटिंच्या बाबतीत माहिती घेण्याची उत्सुकता असते. त्यानंतर स्कॅमर्स हळू-हळू त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर लोकप्रिय गायक दिलजीप दोसांझचा नंबर आहे. दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला प्रचंड गर्दी होते. त्यातच आता दिलजीतचा एक  लाईव्ह कॉन्सर्ट  Dil-Luminati आहे. याच्या तिकिटांची मोठी मागणी आहे. याचाच फायदा उचलत स्कॅमर्स लोकांची फसवणूक करतात. दोसांच्या कॉन्सर्टची तिकिटं असल्याचं सांगत पैशांची लूट केली जाते. 

McAfeeने जाहीर केलेली सेलिब्रेटिंची हॉट लिस्ट
ओरी (ओरहान अवत्रमणि) 
दिलजीत दोसांझ  
आलिया भट्ट  
रणवीर सिंह  
विराट कोहली  
सचिन तेंदुलकर  
शाहरुख खान  
दीपिका पादुकोन  
आमिर खान  
महेंद्र सिंह धोनी

याच वर्षाच्या सुरुवातीला  McAfee ने केलेल्या एका सर्व्हेत जारी केला होता, यात 80 टक्के भारतीय सेलिब्रेटी डीपफेकमुळे जास्त त्रस्त आहे. तर 64 टक्के लोकांचं म्हणण्यानुसार AI तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन स्कॅम ओळखणं कठिण बनलं आहे. 75 टक्के लोकांच्या मते इंटरनेटवर DeepFake कंटेट पाहण्यात आला आहे. तर 38 टक्के लोकांनी डीपफेक स्कॅमचा सामना करावा लागल्याचं सांगितलंय. 18 टक्के लोकं अशा स्कॅमचे शिकार बनले आहेत.. 

फसवणूक झालेल्या 18 टक्के लोकांना सेलिब्रेटिजचे फोटो, व्हिडिओद्वारे ठगण्यात आलं. यात मोठ्या प्रमाणावर पैशांची फसवणूक करण्यात आली आहे.