'या' दिवशी भारतातून करण्यात आला पहिला मोबाईल कॉल, ज्याचे चार्जेस ऐकून थक्कं व्हाल

तुम्हाला हि गोष्ट माहित आहे का भारतात पहिला मोबाईल केव्हा आला

Updated: Aug 14, 2022, 06:07 PM IST
'या' दिवशी भारतातून करण्यात आला पहिला मोबाईल कॉल, ज्याचे चार्जेस ऐकून थक्कं व्हाल title=

15 August independence day of India: यावर्षी भारत ७५वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे ,अमृत महोत्सव आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात बरेच लक्षणीय बदल झाले. मग ते शैक्षणिक बाबतीत असतो किंवा हेल्थ सेक्टरच्या बाबतीत आपण खूप पुढे आलो आहोत या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे टेक्नॉलॉजी  जसजसे दिवस बदलत गेले टेक्नॉलॉजी आधीपेक्षा आणखी ऍडव्हान्स होत गेली आणि टेक्नॉलॉजीमुळेच प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. 

आज आपण जे कॉल करतो त्यासाठी काही मिनिटांसाठी पैसे मोजावे लागतात पण तुम्हाला हि गोष्ट माहित आहे का भारतात पहिला मोबाईल केव्हा आला किंवा पहिला मोबाईल कॉल साठी किती पैसे मोजावे लागले चाल तर मग जाणून घेऊया 

या वर्षी केला होता भारतातून पहिला कॉल 

भारतातून पहिला मोबाईल कॉल 31 जुलै1995 मध्ये केला होता हा कॉल पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी युनियन कम्युनिकेशन मिनिस्टर सुखराम यांना केला होता आणि हि पहिलीच वेळ होती कि कोणत्या तरी भारतीयाने मोबाईल वापरला होता.भारतीयांसाठी हि संधी म्हणजे एक पर्वणीच होती. 

एक मिनिटासाठी किती खर्च आला होता 

आता calling साठी आपण अनलिमिटेड पॅक वापरतो किंवा फोनमध्ये टॉप-अप ऍक्टिव्हेट करतो. अनलिमिटेड calling एकाच वेळी महिन्याचा किंवा वर्षभराचा रिचार्ज करावं लागतो टॉप-अपसाठी मिनिटाला पैसे मोजावे लागतात १ मिनिटासाठी काही पैसे असा हिशोब लावला जातो. पण जेव्हा भारतातून पहिला मोबाईल कॉल केला गेला होता त्याचे चार्जेस जर पहिले तर त्या जमान्यात सर्वात जास्त रक्कम होती आणि सर्वसामान्यांना ही रक्कम परवडणारी न्हवती. 

भारतातून जेव्हा पहिला कॉल केला गेला त्याची रक्कम म्हणजेच चार्जेस होते मिनिटाला आठ रुपये चार पैसे .. त्यावेळी ही रक्कम खूप जास्त होती आणि त्यामुळे बरेच जण लॅंडलाईनचाच वापर करत होते पण जसजसा काळ बदलत गेला हे चार्जेस कमी होत गेले आणि मोबाईचा वापर वाढत गेला 

कोणता होता पहिला मोबाईल 

भारतातून ज्या मोबाइलवरुन कॉल केला गेला तो पहिला मोबाईल होता नोकिया चा..