कोरोना रुग्णाच्या संपर्कात येताच WHO प्रमुख म्हणाले...

संपूर्ण जगात तब्बल २०० पेक्षा जास्त शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.  

Updated: Nov 2, 2020, 09:02 AM IST
कोरोना रुग्णाच्या संपर्कात येताच WHO प्रमुख म्हणाले... title=

नवी दिल्ली : भारताच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पण तरी देखील शासनाकडून  जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. शिवाय संपूर्ण जगात तब्बल २०० पेक्षा जास्त शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तर आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहोम घेब्येयियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी स्वतःला क्वारंटाई,न करून घेतले आहे. 

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. या गोष्टीची माहिती त्यांनी ट्विट करत दिली. ते म्हणाले, 'मी अशा एका व्यक्तीच्या संपर्कात आलो आहे. ज्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. माझी प्रकृती ठिक आहे. शिवाय लक्षण देखील नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

परंतु डब्ल्यूएचओच्या प्रोटोकॉलनुसार मी काही दिवस क्वारंटाईन राहणार असून घरूनच काम करणार आहे. शिवाय सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे. नियमांचे पलन केल्यास कोरोनाची  साखळी तोडण्यास आपल्याला मोठी मदत होणार आहे. असं म्हणतं त्यानी आरोग्य प्रणालीचं रक्षण करण्यास सांगितलं आहे.