15 ऑगस्टच्या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, अलर्ट जारी

काही दिवसात 4 वेगवेगळे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. दिल्ली ते जम्मू-काश्मीर पर्यंत कोणत्याही भागात दहशतवादी हल्ला होऊ शकतो. 

Updated: Aug 13, 2021, 02:50 PM IST
15 ऑगस्टच्या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, अलर्ट जारी title=

मुंबई : देशात 75 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु आहे. 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. पण या दिवशी दहशतवाद हल्ल्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.

काही दिवसात 4 वेगवेगळे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. दिल्ली ते जम्मू-काश्मीर पर्यंत कोणत्याही भागात दहशतवादी हल्ला होऊ शकतो. 

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हल्ला करण्याचा कट रचत आहेत.

पाकिस्तान व्याप्त काश्मीर जवळच्या सीमारेषेवर जवानांना अलर्ट करण्यात आले आहे. कारण दहशतवादी घुसखोरी करुन भारतात येण्याचा प्रयत्न करतील. दहशतवादी मोठा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करु शकतात. सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य केलं जावू शकतं.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी पाकिस्तानमध्ये बसलेले दहशतवादी भारतात हल्ला करण्याचा कट रचत असतात. पण आपले जवान आणि यंत्रणा नेहमी या कटांना चोख प्रत्यूत्तर देताना दिसतात.